जाहिरात

Amravati News: लग्न तुटलं, होणाऱ्या नवऱ्यानं ब्लॉक केलं, आधार देण्याच्या बहाण्याने दोघांनी तिच्यासोबत...

शिवाय रियाझ आणि वसिम या दोघांना ही अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली आहे.

Amravati News: लग्न तुटलं, होणाऱ्या नवऱ्यानं ब्लॉक केलं, आधार देण्याच्या बहाण्याने दोघांनी तिच्यासोबत...
  • अमरावतीत ३५ वर्षीय तरुणीच्या तुटलेल्या लग्नानंतर दोन भामट्यांनी काळ्या जादूच्या नावाखाली फसवणूक केली
  • रियाझ आणि वसिम यांनी लग्न जुळवून देण्याच्या नावाखाली ३२ हजार रुपये घेऊन फसवणूक केली
  • या भामट्यांनी तरुणीचा विश्वास संपादित करून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
अमरावती:

शुभम बायस्कार

एक धक्कादायक आणि तेवढीच भयंकर घटना अमरावतीच्या नांदगाव पेठ परिसरात घडली आहे. एका 35 वर्षीय तरुणीचे लग्न जुळत नव्हते. अशा स्थितीत एका ठिकाणी तिचे लग्न जुळले. पण ते ही तुटले. अशा स्थितीत तुटलेलं लग्न जुळवून देतो असं सांगून दोन भामट्यांनी या तरुणीला आपल्या जाळ्यात ओढलं. काळ्या जादूच्या नावा खाली या तरुणीसोबत शारीरीक संबंध प्रस्थापित केले. पण आपली फसवणूक होत आहे हे लक्षात आल्यानंतर या तरुणीने पोलीस स्थानकात धाव घेतली. त्यानंतर या प्रकरणातील धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. त्यामुळे सर्वच जण हादरून गेले आहेत. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे. 

अमरावतीत एक 35 वर्षीय तरुणी होती. तिचे लग्न जुळत नव्हते. काही तरी करून एका मुलासोबत तिचे लग्न जुळले. पण काही कारणाने ते लग्न तुटले. होणाऱ्या नवऱ्याने तिचा नंबर ब्लॉक ही केला. त्यामुळे ती त्याच्याशी संपर्क ही करू शकत नव्हती. अशा स्थितीत तिने एका अनोळखी मुलाकडून मोबाईल फोन घेतला. त्या द्वारे तिने होणाऱ्या नवऱ्याशी संपर्क केला. तिच्या बोलण्यावरून तिचे लग्न तुटले आहे हे त्या अनोळखी तरुणाच्या लक्षात आले. हीच संधी त्याने साधली. त्या अनोळखी तरुणाने मी तुझे लग्न जुळवून देण्यास मदत करतो असे सांगितले. त्यातून तिने त्या तरुणीची ओळख रियाझ या व्यक्तीशी करून दिली. 

नक्की वाचा - Heat wave: जगात सर्वात उष्ण शहरांच्या यादीत अकोला दुसऱ्या क्रमांकावर, पहिल्या क्रमांकावर कोण? यादी आली समोर

रियाझने तिची ओळख वसिम या तरुणासोबत करून दिली. त्याने तुझ्या अडचणी दूर करतो असं सांगिलं. त्यासाठी पुजा करावी लागेल असं ही त्या तरुणीला सांगितलं. ही पुजा झाल्यानंतर तुझे लग्न जुळेल असं ही त्याने सांगितले. पुजेसाठी वसिमने 32 हजार रुपये घेतले. पण वसिमने काही केले नाही. त्यामुळे त्या तरुणीने पुन्हा एकदा रियाझशी संपर्क केला. त्याने तिला वसिमकडून पैसे घे असं सांगितलं. शिवाय तुझं काम मी करून देतो असं ही सांगितलं. असं बोलून त्याने त्या तरुणीला आपल्या जाळ्यात ओढलं. तिचा विश्वास संपादीत केला. 

नक्की वाचा - Pratap Sarnaik: मराठी सक्तीबाबत काय निर्णय झाला? रिक्षा- टॅक्सी चालकांचं टेन्शन वाढलं की कमी झालं?

या विश्वासाच्या जोरावर रियाझने या तरुणी सोबत वारंवार शारीरक संबंध प्रस्तापित केले. हे सत्र थांबत नव्हते. शिवाय लग्न ही जुळत नव्हते. पुढे यातून त्या तरुणीची झळवणूक सुरू झाली. होणारा त्रास लक्षात घेता आपले शोषण सुरू असल्याचं तिला समजलं. त्यामुळे तिने तक्रार देण्याचा निर्णय घेतला. तिने पोलीसात धाव घेत झालेला प्रकार सांगितला. त्यानुसार पोलीसांना तातडीने कारवाई केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय रियाझ आणि वसिम या दोघांना ही अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त  गणेश शिंदे यांनी दिली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com