जाहिरात

Amravati News : एक तरुण, 180 मुली, 350 अश्लील व्हिडिओ व्हायरल; अमरावतीत खळबळ

परतवाडा शहरातील मोहम्मद अयान मोहम्मद तन्वीर या युवकाने अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Amravati News : एक तरुण, 180 मुली, 350 अश्लील व्हिडिओ व्हायरल; अमरावतीत खळबळ
AI Image

शुभम बायस्कार, प्रतिनिधी 

Amravati News  : परतवाडा शहरातील मोहम्मद अयान मोहम्मद तन्वीर या युवकाने अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संतापजनक बाब म्हणजे या प्रकरणात ३५० हून अधिक अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचंही उघडकीस आलं आहे. यावरून आक्रमक होत राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण विशाल आनंद यांची भेट घेऊन सविस्तर लेखी निवेदन सादर केले. सोबत पेन ड्राईव्हमध्ये फोटो आणि व्हिडिओ पुरावेही दिले.

खासदार अनिल बोंडे यांनी निवेदनात नमूद केलं की, अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उर्दू भाषेत व्हॉट्सअॅप आणि स्नॅपचॅट ग्रुप तयार केले जात आहेत. या ग्रुपमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींना शिक्षणाच्या नावाखाली समाविष्ट केले जाते. त्यानंतर त्यांचे नंबर काही मुस्लीम तरुणांना दिले जातात. हे तरुण संपर्क साधून मैत्री करतात. सुरुवातीला सामान्य गप्पा मारतात आणि नंतर अश्लील लिंक, व्हिडिओ आणि मेसेज पाठवून ब्लॅकमेलिंगचं जाळं विणतात. ग्रुप चालवणारे लोक मुलांना अश्लील व्हिडिओ पाठवतात, लिंक व मुलींचे नंबर शेअर करतात. मोबाइलवर अश्लील व्हिडिओ पाठवून सोशल मीडियावर व्हायरल केले जात असल्याचा धक्कादायक उल्लेख खासदार डॉ.अनिल बोंडे यांच्या पत्रात आहे. 

निवेदनानुसार, परतवाड्यातील अयान मोहम्मद याने १८० हून अधिक मुलींना आपल्या जाळ्यात ओढले. त्याने त्यांच्यासोबत मुंबई, पुणे येथे जाऊन अश्लील व्हिडिओ तयार केले. या मुलींचे ३५० पेक्षा जास्त व्हिडिओ तयार करून ते व्हायरल केले. वेश्याव्यवसायात ढकलण्यासाठी मुलींना धमकावले. व्हिडिओ व्हायरल करण्याची व जीवे मारण्याची धमकी देऊन मुलींना वश केले. पुरावे दाखवण्याची हिंमत न होण्यासाठी मुलींवर सातत्याने दबाव ठेवला.

नक्की वाचा - Pune News :प्राध्यापकाने स्टँम्प पेपरवर लिहिलं मात्र केलं भयंकर; पुण्यात Phd च्या विद्यार्थिनीचा दुर्देवी शेवट

पोलिसांच्या निष्क्रियतेवर बोंडेंचा जाब

खासदार बोंडे यांनी पोलिसांच्या निष्क्रियतेवर तीव्र संताप व्यक्त केला. तीन दिवसांपासून व्हिडिओ व्हायरल होत असताना परतवाडा पोलिसांनी सुमोटो कारवाई का केली नाही?" असा थेट सवाल त्यांनी एसपींना केला. आरोपी कुटुंबासह परतवाड्यातून फरार झाल्याचेही त्यांनी सांगितले.


मागण्या काय आहेत?

बोंडे यांनी एसपींकडे खालील मागण्या केल्या —

  • तातडीने एसआयटी स्थापन करावी
  • महिला अधिकारी व सायबर विभागाचा समावेश असावा
  • नाबालिग मुलींच्या सुरक्षिततेसाठी समिती स्थापन करावी 
  • अमरावती जिल्ह्यातील सर्व संशयित गुन्हेगारी ग्रुप्सचा सखोल तपास व्हावा
  • आरोपींवर तातडीने गुन्हे दाखल करून अटक करावी

संध्याकाळपर्यंत कारवाई नाही तर बुधवारी आंदोलन...

आज संध्याकाळपर्यंत गुन्हे दाखल होऊन आरोपींना अटक न झाल्यास बुधवारी एसपी कार्यालयासमोर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा खासदार बोंडे यांनी दिला आहे. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने त्यावर पणाला लागलेले अनेक अल्पवयीन मुलींचं आयुष्य सुरक्षित करणं ही प्राथमिकता असल्याचं त्यांनी सांगितले. यावेळी महापौर श्रीचंद तेजवानी, भाजप प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, नेहा अभय वाजपेयी, अभय वाजपेयी, नगरसेवक आशिष अटकरे, ऋषिकेश देशमुख, राधा कुरील, नगरसेविका सुरेखाताई लुंगारे, विक्की शर्मा,  गटनेता चेतनभाऊ गावंडे, नगरसेवक प्रदीप हिवसे उपस्थित होते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com