
योगेश लाठकर, प्रतिनिधी
आजही अनेक गावांमध्ये लहानसे कोनाडे असतात. या कोनाड्यांमध्ये आवश्यक आणि तत्काळ लागणाऱ्या वस्तू जपून ठेवल्या जातात. मात्र नांदेडमधील एका गावात याच कोनाड्यामुळे एका आठ वर्षांच्या चिमुरड्याचा जीव गेला आहे. या घटनेमुळे गावभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
घरातील कोनाड्यात जपून ठेवलेले सोनकिडे आणि काजवे काढण्यासाठी गेलेल्या एका आठ वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. या कोनाड्यात हात घातला अन् तिथेच त्याचा काळ आला. या आठ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू घडल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील माळझरा येथे घडली आहे.
कार्तिक माधव खोकले हा आठ वर्षीय चिमुकला इयत्ता दुसरी शिकतो. रविवारी त्याच्या शाळेला सुट्टी असल्याने तो त्याच्या आई-बाबांसोबत शेतात गेला होता. शेतात फिरत असताना त्याला सोनकिडे आणि काजवे दिसले. या काजव्याच्या आणि सोनकिड्याचे आकर्षण वाटल्याने त्याने हे सर्व सोनकिडे आणि काजवे एकत्र केले आणि खेळण्यासाठी घरी आणून आगपेटीच्या रिकाम्या डब्यात ठेवले.
नक्की वाचा - जन्मदात्या आईचा प्लान, मामाच्या हातात पिस्तुल; लैंगिक शोषण झालेल्या अल्पवयीन पीडितेचा भयंकर शेवट
ही पेटी त्याने घरातील एका कोनाड्यात ठेवली. सोमवार 23 सप्टेंबर रोजी तो शाळेत गेला. शाळा संपल्यानंतर संध्याकाळी घरी आल्यावर त्याने कोनाड्यात ठेवलेले सोनकिडे खेळण्यासाठी बाहेर काढण्याचा विचार केला. तो कोनाड्या जवळ गेला आणि कोनाड्यात ठेवलेली आगपेटी काढण्यासाठी त्याने हात घातला पण त्याचवेळी या कोनाड्यात असलेल्या सापाने कार्तिकला दंश केला. कार्तिक जागेवर कोसळला. त्याचा आवाज ऐकून त्याचे पालक तिथे धावत आले. आणि त्यांनी तत्काळ कार्तिकला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले पण उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. ही घटना नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात असलेल्या माजरा या गावात घडली आहे. अन् सो
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world