जाहिरात

Nanded News: नांदेड हादरलं! दहावीच्या परीक्षेपूर्वीच 17 वर्षीय मुलाचा अंत; रेड्यांच्या टकरीचा खेळ बेतला जिवावर

Nanded News: नांदेडच्या कंधार तालुक्यातील आलेगाव येथे आयोजित रेड्यांच्या टकरीत 17 वर्षीय खंडू झम्पलवाड या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दहावीच्या परीक्षेपूर्वीच काळाने घाला घातल्याने बाचोटी गावावर शोककळा पसरली आहे.

Nanded News: नांदेड हादरलं! दहावीच्या परीक्षेपूर्वीच 17 वर्षीय मुलाचा अंत; रेड्यांच्या टकरीचा खेळ बेतला जिवावर
"Nanded News: दहावीच्या परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्याचा मृत्यू, धक्कादायक कारण समोर"
NDTV Marathi

- योगेश लाटकर, प्रतिनिधी

Nanded News: नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातून एक अतिशय हृदयद्रावक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. कंधार तालुक्यातील आलेगावात रेड्यांच्या टकरीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान एका निष्पाप मुलाचा बळी गेलाय. आलेगाव येथे रविवारी (15 फेब्रुवारी) आयोजित करण्यात आलेल्या या जीवघेण्या खेळात 17 वर्षीय खंडू झम्पलवाड या मुलाचा जागीच मृत्यू झाला.

कंधार तालुक्यातील आलेगाव इथल्या उत्साही मंडळींनी रविवारी रेड्यांच्या टक्करीचे आयोजन केले होते. या वेळी रेड्याची शेवटची टक्कर सुरू असताना एका मुलाला रेड्याने जोरदार धडक दिली. या धडकेत खंडू झम्पलवाड या बाचोटी इथल्या मुलाचा मृत्यू झालाय. खंडू हा आता सुरू होणारी दहावीची परीक्षा देणार होता. त्याच्या मृत्यूमुळे बाचोटी गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेप्रकरणी उस्माननगर पोलिसांनी नोंद घेतली असून गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे.

दहावीच्या परीक्षेपूर्वीच काळाचा घाला: काय आहे संपूर्ण घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, कंधार तालुक्यातील आलेगाव येथे रविवारी (15 फेब्रुवारी) उत्साही मंडळींनी रेड्यांच्या टकरीचा थरार आयोजित केला होता. ही टक्कर पाहण्यासाठी परिसरातील गावांतून मोठी गर्दी जमली होती. बाचोटी परसिरातील खंडू झम्पलवाड हा 17 वर्षीय तरुण देखील हा खेळ पाहण्यासाठी आला होता. कार्यक्रम सुरू असताना एका मुलाला रेड्याने जोरदार धडक दिली. या धडकेत खंडूचा मृत्यू झाला. ही धडक इतकी भीषण होती की, खंडू गंभीर जखमी झाला आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

(नक्की वाचा: Crime News: बदलापुरात खळबळ! चित्रकला स्पर्धेचं आमीष दाखवून पालकांसह मुलांना बोलावलं अन्...)

बाचोटी गावावर शोककळा; स्वप्न अर्धवटच राहिली

मृत पावलेला खंडू झम्पलवाड हा अवघ्या 17 वर्षांचा होता. हृदयद्रावक बाब म्हणजे अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी तो तयारी करत होता. एका बाजूला परीक्षेचे टेन्शन आणि दुसरीकडे भविष्याची स्वप्ने उराशी बाळगून असलेल्या खंडूचा अशा प्रकारे अंत झाल्याने संपूर्ण बाचोटी गावावर शोककळा पसरली आहे.  

(नक्की वाचा: Satara Crime: 'तू रात्री 3 वाजता...' 'Valentine Day'ला शिक्षकाचा विद्यार्थिनीसोबत भयंकर प्रताप, कराडमधील घटना)

रेड्यांच्या टकरीसारखे खेळ अनेकदा प्राण्यांवरील क्रूरता आणि मानवी जीवन धोका असल्याने वादात सापडतात. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट आहे. सुरक्षेची कोणतीही खबरदारी न घेता अशा स्पर्धा कशा आयोजित केल्या गेल्या, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com