नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देशाला हादरवणारी घटना समोर आली आहे. लखनऊमध्ये एका भावाने आपल्या आई आणि चार बहिणींची ब्लेडने वार करून हत्या केली. प्राथमिक तपासात ही हत्या घरगुती वादातून झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात होता. दरम्यान या प्रकरणात आरोपीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अर्शद नावाच्या तरुणाने स्वत:ची आई आणि चार बहिणींची हत्या केली. यासाठी त्याने घराजवळ राहणाऱ्यांना जबाबदार धरलं आहे. आग्रामध्ये राहणाऱ्या अर्शदने त्या व्हिडिओमध्ये त्याच्या वस्तीत राहणाऱ्यांची नावंही घेतली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
व्हिडिओमध्ये आरोपी मोहम्मद अर्शद म्हणतो, माझं नाव मोहम्मद अर्शद आहे. आज वस्तीतील लोकांमुळे त्यांना हे पाऊल उचलावं लागलं. आज मी माझ्या चार बहिणी, आईचा जीव घेतला आहे. वस्तीतील लोकांनी आमचं घर बळकावण्यासाठी आमच्यावर अनन्वित अत्याचार केले. आम्ही मदत मागितली, मात्र कोणीच आमचं म्हणणं ऐकलं नाही. गेल्या 15 दिवसांपासून आम्ही फूटपाथवर झोपतोय. थंडीत फिरतोय. त्यांनी आमचं घर बळकावलं.
नक्की वाचा - Crime news : पत्नीकडून पतीचा छळ, फोनवर जोरदार भांडण, नववर्षाच्या पुर्वसंध्येला भयंकर घडलं
आमच्याकडे घराची कागदपत्र आहेत हे घर आम्ही मंदिराला दान करू इच्छित होतो. धर्मपरिवर्तन करू इच्छित होतो. यासाठी सर्व कागदपत्र आम्ही स्वत:जवळ ठेवली होती. हे कुटुंब उत्तर प्रदेशात राहणारं असतानाही त्यांच्यावर बांगलादेशी असल्याचा आरोप केला जात होता. यासाठी आम्ही बजरंग दल, भाजप, अनेक नेत्यांकडे मदत मागितली. आम्ही भारतीय असल्याचा पुरावाही त्यांना देण्यास तयार होतो. वस्तीतील लोकांमुळे आम्ही त्रस्त झालो होतो. त्यामुळेच आम्ही धर्मपरिवर्तन करू इच्छित होतो.
लखनऊ पोलिसांना आणि आदित्यनाथ योगींकडे अर्शदने विनंती केली आहे. आम्हाला त्रास देणाऱ्या या मुस्लिमांना सोडू नका. तुम्ही जे करताय ते अत्यंत योग्य आहे. मुस्लीम लोक प्रत्येक ठिकाणी जमिनी बळकावत आहेत आणि लोकांवर अन्याय करतात. गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही काहीच करू शकलो नाही. आमच्या मृत्यूसाठी संपूर्ण वस्ती जबाबदार आहे.
नक्की वाचा - Family Murder : नववर्षानिमित्त कुटुंब लखनऊला फिरायला गेले, हॉटेलमध्येच आईसह चार बहिणींची हत्या
24 वर्षीय अरशदने बुधवारी सकाळी आपल्या आईसह चार बहिणींच्या हातावरील नस आणि गळा चिरून त्यांची हत्या केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला घटनास्थळावरुन अटक केली आहे. सध्या हॉटेलमध्ये अर्शदच्यासोबत असलेला आरोपीचे वडील फरार आहेत. या हत्याकांडात त्याच्या वडिलांचाही समावेश असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊ हत्याकांडाचा आरोपी अर्शद आगरामध्ये इस्लाम नगरमध्ये राहत होता. 30 डिसेंबरला कुटुंबातील 7 लोक आग्राहून लखनऊला गेले होते. कुटुंबात अर्शदची पत्नी, चार मुली आणि एक मुलगा आहे. हे कुटुंब लखनऊच्या चारबाग नाका भागातील हॉटेल शरणजीतच्या खोली क्रमांक 109 मध्ये थांबले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world