- अजिंक्य धायगुडे-पाटील, प्रतिनिधी
Pune News: वर्ष 2019 सालची 'मिस इंडिया अर्थ' या किताबाची मानकरी आणि प्रसिद्ध मॉडेल सायली सुर्वे हिने पुन्हा एकदा हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. पिंपरी-चिंचवडमधील रहिवासी असलेल्या सायलीने रीतसर शुद्धीकरण प्रक्रिया पूर्ण करत आपले जुने नाव बदलून आता आद्या सुर्वे असे ठेवले आहे.
घरच्यांचा विरोध झुगारून केले होते लग्न
सायली सुर्वेने वर्ष 2019 मध्ये मीरा भाईंदर येथील प्रसिद्ध उद्योजक आतिफ तासे (Aatif Tase) याच्याशी विवाह केला होता. सायलीने (Sayali Surve News) लग्न करताना आपल्या कुटुंबीयांचा विरोध झुगारला होता. प्रेमाखातर तिने धर्मांतर स्वीकारले होते आणि लग्नानंतर तिचे नाव 'अतेझा तासे' असे ठेवण्यात आले होते. पण तिचा संसार फार काळ टिकला नाही.
छळ आणि जबरदस्तीने धर्मांतराचा आरोप
सायलीने प्रसारमाध्यमांशी बोलताना खळबळजनक आरोप केले आहेत. "आतिफ तासेशी लग्न करणे ही माझी आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती," असे तिने सांगितले. लग्नानंतर काही काळातच छळ सुरू झाल्याचा आणि धर्मांतर केल्याचाही आरोप तिने केलाय. या त्रासाबाबत तिने वारंवार पोलिसांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत तिने व्यक्त केली.
(नक्की वाचा: Pune News: मोबाईल लोकेशन अन् लाल कपडे...आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा पुणे पोलिसांनी वाचवला असा जीव!)
हिंदुत्ववादी संघटनांच्या मदतीने घरवापसीअनेक महिने छळ सहन केल्यानंतर सायलीने हिंदुत्ववादी संघटनांशी संपर्क साधला. त्यांच्या पाठबळामुळे आणि मार्गदर्शनामुळे सायलीने पुन्हा आपल्या मूळ धर्मात परतण्याचा निर्णय घेतला. पिंपरी-चिंचवड येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, जिथे होम-हवन आणि मंत्रोच्चार करत सायलीची शुद्धीकरण प्रक्रिया पार पडली.
या शुद्धीकरण सोहळ्यानंतर सायलीचे 'अतेझा' हे नाव बदलून आता 'आद्या सुर्वे' असे नवीन नामकरण करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी चर्चा रंगली असून धर्मांतर आणि छळाच्या प्रकरणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world