Ashok Kharat : आता तर किळसपणाची हद्दच झाली; गर्भवती महिलेसोबत संतापजनक कृत्य, अशोक खरातविरोधात आणखी एक गुन्हा

भोंदूबाबा अशोक खरातविरोधात लैंगिक अत्याचार आणि जादूटोणा प्रकरणात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Ashok Kharat : महाराष्ट्राला हादरवणाऱ्या अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. भोंदूबाबा अशोक खरातविरोधात लैंगिक अत्याचार आणि जादूटोणा प्रकरणात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात अशोक खरात विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत खरातचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये खरातने कार्यालयात महिलेवर तंत्र-मंत्राच्या नावाखाली लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. 

गर्भवती महिलेवर लैंगिक अत्याचार...

आता नाशिकमधून आणखी एक प्रकार समोर आला असून किळसवाणी बाब म्हणजे पीडित महिला गर्भवती असताना नराधम खरातने तिचं लैंगिक शोषण केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. गरोदरपणात पूजा विधीच्या नावाखाली नराधम खरातने लैंगिक अत्याचार केला. याशिवाय पीडित महिला आणि तिच्या कुंटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. नराधम खरात महिलेसोबत आलेल्या पतीला बाहेर बसवून एका खोलीत तिचे लैंगिक शोषण करत असल्याचा उल्लेख आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Ashok Kharat : अशोक खरातचा धक्कादायक प्रताप, आजोळही सोडलं नाही; नाशिकच्या 2 तक्रारींनी प्रकरण पेटणार

अघोरी कृत्य करत असल्याची तक्रार...


अशोक खरात नकली साप आणि नकली वाघाचे कातडी आणून लोकांना घाबरवून अघोरी कृत्य करत असल्याचा देखील या तक्रारीत उल्लेख आहे. नराधम अशोक खरात विरोधात लैंगिक अत्याचार, महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक BNS ६४ ( १ ) ७४ / ३५१ ( २ ) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.