सुनील दवंगे, प्रतिनिधी
Ashok Kharat News Today : मुंबईसह राज्यातील विविध भागांतील भक्तांची फसवणूक करत भोंदू अशोक खरातने उभारलेल्या आर्थिक जाळ्याचे धक्कादायक तपशील आता समोर येऊ लागले आहेत.देवदर्शनाच्या नावाखाली निष्पाप भक्तांकडून कागदपत्रे गोळा करून त्यांच्याच नावावर पतसंस्थांमध्ये खाती उघडल्याची माहीती खात्रीलायक सुत्रांकडून जाहीर करण्यात आलं आहे.
या प्रकरणात आतापर्यंत शिर्डी पोलिसांकडून 19 जणांची चौकशी पूर्ण झाली असून तपास यंत्रणांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे.मुंबई,ठाणे,धुळे भागातील 19 जणांची आज शिर्डी पोलीसांनी चौकशी केली. या सर्वांना आपली खाते समता पतसंस्थेत असल्याचे माहीतीच नव्हते. त्यामुळे आता पतसंस्थेच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
तपासादरम्यान खरातने एकूण 132 बँक खात्यांचे जाळे उभारले असल्याची धक्कादायक बाब समोर आली होता. त्यापैकी तब्बल 100 खाती ‘समता पतसंस्था'मध्ये उघडण्यात आली.ज्यामुळे या संस्थेच्या कारभारावरही संशयाचे सावट निर्माण झाले आहे.
नक्की वाचा >> Shirdi News: "माझ्या मृत्यूला कॅप्टन खरात जबाबदार", भोंदूबाबाची शिर्डीतील 4 वर्षांपूर्वीची फाईल आली समोर
तापर्यंत जवळपास 60 कोटी रुपयांची उलाढाल
57 जणांच्या नावावर ही 100 खाती उघडण्यात आली. मात्र या खात्यांचे खरे नियंत्रण आणि व्यवहार स्वतः अशोक खरात करत असल्याचं आता स्पष्ट होतंय. अनेक खातेदारांना त्यांच्या नावावर खाते उघडल्याची कल्पनाही नसल्याचं सांगितलं जातं. या खात्यांमधून आतापर्यंत जवळपास 60 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज तपासातून व्यक्त केला जातोय.
नक्की वाचा >> Akola News: अकोल्यात 'या' भागात मोठी दहशत, धुरंधर पाहिल्यावर चाकू हल्ल्यांचा रिअल थरार, 8 तासानंतर गेम पलटला
या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार, फसवणूक आणि सावकारीच्या अनियमिततेचे गंभीर आरोप पुढे येत आहेत. दरम्यान,या प्रकरणाचा तपास अधिक खोलवर गेला असून पतसंस्थेतील अधिकाऱ्यांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.पुढील काळात या घोटाळ्यात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world