जाहिरात

Ayush Komkar Case: नातवाचा मर्डर बंडू आंदेकरचे साम्राज्य संपवणार! पोलिसांचा दणका, समोर आली सगळी काळीकुंडली

Pune Ayush Komkar Murder Case Vanraj Andekar Toli: खात्यांमध्ये ५० लाख ६६ हजार रुपये देखील असल्याची माहिती समोर आली. तर दुसरीकडे, आंदेकर टोळीच्या जुगार अड्ड्यावर देखील करवाई करण्यात आली होती. 

Ayush Komkar Case: नातवाचा मर्डर बंडू आंदेकरचे साम्राज्य संपवणार! पोलिसांचा दणका, समोर आली सगळी काळीकुंडली

सुरज कसबे, प्रतिनिधी:

Ayush Komkar Murder Case:  आयुष कोमकरची निर्घृण हत्या ५ सप्टेंबरला करण्यात आली होती. वनराज आंदेकरच्या (Vanraj Andekar Case) खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने वनराज आंदेकरच्या बहिणीच्या मुलाला म्हणजेच आयुष कोमकरला गोळ्या घालून ठार मारले. या सगळ्या प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्यासह १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आंदेकरांच्या अवैध धंद्यावर टाच

टप्प्याटप्प्यात या आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आंदेकर टोळीवर मकोकाचा गुन्हा दाखल करत या टोळीच्या अवैध धंद्यावरही टाच आणली. आज सलग दुसऱ्या दिवशी जेव्हा आंदेकर टोळीकडून करण्यात आलेल्या अतिक्रमणावर करवाई पुणे महानगरपालिकेकडून आणि पुणे पोलिसांकडून करण्यात येत आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणी सगळ्यात पहिली कारवाई पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून करण्यात आली होती.

आठव्या मजल्यावर काय दडलंय?

गणेश पेठतेतील आंदेकर टोळीच्या ८ मजली राहत्या घराची झाडाझडती केल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तब्बल ७७ तोळे सोने, चांदी आणि इतर ऐवज असा एकूण ६७ लाख हून अधिक रुपयांचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला होता. परंतू या कारवाईमधील सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे राहत्या घरात ८ मजले आहेत आणि ८ व्या मजल्यावर पुणे पोलिसांना जाता आले नव्हते, कारण त्या मजल्याला फिंगर प्रिंट लॉक सिस्टम आहे. त्यामुळे नेमके त्या मजल्यावर काय आहे ते निष्पन्न झाल नाही. त्या मजल्याला ना खिडकी ना बालकनी म्हणून अजूनही त्या मजल्यावर काय आहे हे निष्पन्न झाल नाही. 

Ayush Komkar Case: भयंकर सूडचक्र! एक मर्डर अन् अख्खं कुटुंब तुरुंगात, पुण्याच्या गँगवॉरची हादरवणारी STORY

दहशत, खंडणी अन् अमाप संपत्ती

पहिल्या दिवसापासून पुणे पोलिसांच्या अतिरिक्त आयुक्त, गुन्हे, पंकज देशमुख यांनी सांगितलं होत की आंदेकर टोळीच्या सगळ्या अवैद्य चालणाऱ्या गोष्टी हे पुणे पोलिसांच्या रडारवर असतील. त्या अनुषंगाने, घराची झाडाझडती झाल्यानंतर आंदेकर टोळीचा मुख्य आर्थिक स्तोत्र असलेल्या नागझरी मासळीबाजारावर करवाई करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून स्वतंत्र शाशकीय इमारत देऊनही गणेश पेठेत हा मासळीबाजार रस्त्यावर आणि नाल्याजवळ अवैद्यरीत्या चालत होता (Play Fish Market visuals) 

रोज 20 ते 75 हजारांची खंडणी

अनेक वर्षांपासून आंदेकर टोळी या मासेविक्रेत्यांकडून रोजचे कीमान २० ते ७५ हजार रुपयांची खंडणी ६० मासळी विक्रेत्यांकडून घेत होते. त्यावर पुणे पोलिसांनी करवाई करत एकूण ११ जणांवर, जे कोमकर प्रकरणी आरोपी आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या मासळीबाजारातून अमागच्या १२ वर्षांमध्ये तब्बल २० कोटींची खंडणी आंदेकर टोळीने गोळा केल्याचीही माहिती समोर आली आहे. 

बँक खाती सील

एवढेच नव्हेतर आंदेकर टोळीला पुणे पोलीस आणि पुणे महानगरपालिकेकडून चांगलाच दणका देण्यात येत आहे. पहिले घर, मग आर्थिक स्तोत्र असलेली मासळी बाजार, आणि सगळ्यात महत्वाची करवाई या सगळ्यामध्ये म्हणजे आंदेकर परिवाराचे जवळपास २७ बँक खाते गोठवण्यात आले. त्या सोबत लॉकर आणि इतर आर्थिक व्यवहार करता येईल असे सगळे खाते गोठवण्यात आले. त्या खात्यांमध्ये ५० लाख ६६ हजार रुपये देखील असल्याची माहिती समोर आली. तर दुसरीकडे, आंदेकर टोळीच्या जुगार अड्ड्यावर देखील करवाई करण्यात आली होती. 

Andekar Gang History: नाना पेठेत दहशत! टोळी प्रमुख ते राजकारण, आंदेकर गँगची डेंजर हिस्ट्री

दरम्यान, आयुष कोमकर प्रकरण समोर आल्यानंतर या सगळ्या कारवाया करण्यात आल्या. हे सगळे अवैद्य धंदे गेल्या अनेक वर्षांपासून चालू होते. त्यात बंडू आंदेकर याच्यावर आधीही मकोका अंतर्गत करवाई झाली होती मग पोलिसांना हे सगळे धंदे आधी दिसून आले नसावेत का? टोळी युद्ध पुण्यात पुन्हा डोकं वर काढायला लागल्यानंतर ही करवाई का करण्यात आली? जेव्हा १५ ते २० दिवसांच्या कालावधीमध्ये जर पुणे पोलिस किंवा पुणे महानगरपालिका एवढी मोठी करू शकते तर आधी, जेव्हा हे धंदे चालूच होते तेव्हा का करवाई करण्यात आली नाही? असा सवाल आता उपस्थित होत आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com