जाहिरात

Baba Siddiqui : बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे धक्कादायक कारण; गेल्या 30 दिवसांपासून सुरू होता हत्येचा प्लान

Baba Siddiqui : 9.9 MM गनने सिद्दीकींवर गोळीबार झाल्याची माहिती असून दया नायक यांच्याकडे तपासाची सूत्र सोपवण्यात आली आहे.

Baba Siddiqui : बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे धक्कादायक कारण; गेल्या 30 दिवसांपासून सुरू होता हत्येचा प्लान
मुंबई:

अजित पवार गटाचे नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दींकींची गोळ्या झाडून हत्या (Baba Siddiqui shot dead) करण्यात आली आहे. रात्री साडेआठच्या सुमारास वांद्रे येथील खेरवाडी जंक्शनजवळ बाबा सिद्दीकींवर तीन अज्ञातांनी गोळीबार केला. लिलावती रुग्णालयात बाबा सिद्दीकींना दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील पिस्तूल पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे.

9.9 MM गनने सिद्दीकींवर गोळीबार झाल्याची माहिती असून दया नायक यांच्याकडे तपासाची सूत्र सोपवण्यात आली आहे. सकाळी 8 वाजता शवविच्छेदनाला सुरुवात होणार आहे. याची व्हिडिओग्राफी करण्यात येणार आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडूनही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या तपासात काय-काय आलं समोर? 10 ठळक मुद्दे

नक्की वाचा - Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या तपासात काय-काय आलं समोर? 10 ठळक मुद्दे

या हत्येमागे बिश्नोई गँगचा सहभाग असल्याची माहिती NDTV मराठीला सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गेल्या 25-30 दिवसांपासून त्या भागात रेकी करत होते. ज्या ठिकाणी गोळीबात झाला त्या ठिकाणी तिघंही आरोपी काही वेळ थांबले होते. आरोपींना आणखी कोणीतरी माहिती पुरवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. या आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलंय. करनैल सिंग हा हरियाणाचा रहिवासी आहे आणि धर्मराज कश्यप हा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. 

कशी झाली हत्या?
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी गोळीबार झाला, तिथे फटाके वाजत होते. फटाक्यांच्या आवाजामुळे बाबा सिद्दीकी यांना गोळी लागल्याचं इतरांना कळालंच नाही. घटनेची माहिती मिळताच बाबा सिद्दिकी यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहचेपर्यंत मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. गोळी शरीरातच अडकली होती. त्यामुळे रुग्णालयाचा नेण्यापूर्वीच त्यांचा मृ्त्यू झाल्याची माहिती मिळत आहे.