जाहिरात

Zeeshan Siddiqui : 'जे हाल तुझ्या वडिलांचे केले तेच तुझे करू'; बाबा सिद्दीकींचा मुलगा टार्गेटवर, कुणी दिली धमकी?

बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झिशान सिद्दीकी यांना ईमेलच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

Zeeshan Siddiqui : 'जे हाल तुझ्या वडिलांचे केले तेच तुझे करू'; बाबा सिद्दीकींचा मुलगा टार्गेटवर, कुणी दिली धमकी?

बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झिशान सिद्दीकी यांना ईमेलच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यापूर्वी देखील झिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. मुंबई पोलीस वांद्रे येथील झिशान सिद्दीकी यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

12 ऑक्टोबर 2024 ला बाबा सिद्दीकी यांच्यावर वांद्रे पूर्वेकडील त्यांच्या कार्यालयासमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आता पुन्हा झिशान सिद्दीकी यांना धमकी आल्यानं, सिद्दीकी यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या ईमेल आयडीवर धमकीचा मेल पाठवण्यात आला आहे.
 

बाबा सिद्दीकी यांची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली त्या प्रकारे तुझी हत्या करण्यात येईल असा धमकीचा मेल झिशान सिद्दीकी यांना पाठवण्यात आला आहे. झिशान सिद्दीकी यांच्याकडून याबाबत मुंबई पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. ईमेल पाठविणाऱ्याने झिशान सिद्दीकीकडे दहा कोटींची मागणी केली आहे. या मेलमध्ये पुढे लिहिलंय, तुझ्या वडिलांसोबत जे झालं ते दुर्देवी होतं. मात्र तू पैशांची तरतूद केली नाही आणि पोलिसांना याबाबत सांगितलं तर तुझ्यासोबतचही तसंच होईल. दिलशाद नावाच्या एका व्यक्तीने झिशान सिद्दीकी यांना तीन मेल करून धमकी दिली आहे. या ईमेलच्या डिस्प्ले पिक्चरमध्ये बंदूक आणि सहा गोळ्या आहेत. त्यांना आज तिसरा मेल आला आहे. 

झिशान सिद्दिकी यांना गेल्या  2 दिवसांपासून धमकीचे मेल येत असल्याची माहिती आहे. या मेलमध्ये 10 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. रिमायंडरसाठी प्रत्येकी 6 तासांनंतर मेल करणार असल्याचा उल्लेख आहे.

बाबा सिद्दीकी प्रकरणात आरोपी कोण?

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई क्राइम ब्रान्चद्वारा मकोका कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, अनमोल बिश्नोईच्या सांगण्यावरुन बाबा सिद्दीकीची हत्येसाठी पैशांची व्यवस्था करण्यात आली होती.  करण्यासाठी आली होती. या प्रकरणात 4590 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या आरोपपत्रात 26 आरोपी आणि 3 फरार आरोपींच्या नावांचा समावेश आहे. ज्यामध्ये शुभम लोणकर, झिशान अख्तर आणि अनमोल बिश्वोई यांच्या नावांचा समावेश आहे. 

बाबा सिद्दीकीच्या हत्या प्रकरणात पोलीस तपासानुसार हत्या करण्यामागे तीन प्रमुख कारणं आहेत. पहिलं सलमान खानसोबत जवळकीचे संबंध, अनुज थप्पनच्या आत्महत्येचा सूड आणि बिश्नोई गँगची दहशत निर्माण करणं.  


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: