
UP Crime News: उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि नात्यांना काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील सासू आणि मुलीनं (मृत व्यक्तीची पत्नी मिळून जावयाची हत्या केली आहे. अवैध संबंध, ब्लॅकमेलिंग आणि मालमत्ता विक्रीचा वाद या त्रयीमुळे ही खळबळजनक घटना घडल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. हत्येपूर्वी जावयाला झोपेच्या गोळ्या देऊन बेशुद्ध करण्यात आले आणि नंतर गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली. या गुन्ह्याला आत्महत्या भासवण्यासाठी मृतदेह गळफास देऊन लटकवण्यात आला होता.
काय आहे प्रकरण?
बागपत येथील बिनौली पोलीस स्टेशन हद्दीतील जीवना गालियान गावात ही घटना घडली आहे. सोनू सैनी याचा मृत्यू सुरुवातीला आत्महत्या असल्याचे भासवून त्याचा अंतिम संस्कारही करण्यात आला होता. मात्र, मृतकाच्या भावाला संशय आल्याने त्याने पोलिसांत हत्येची तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली. पोलिसांनी तपास सुरू केल्यावर जे सत्य बाहेर आले, ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला.
( नक्की वाचा : Video: 'नवरा दारु पितो, दुसऱ्या मुलींशी बोलतो आणि सासरा...', विवाहित महिलेनं रडत-रडत उचललं टोकाचं पाऊल )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक सोनू सैनी याचे त्याची सासू सरोज हिच्यासोबत अनैतिक संबंध होते. या संबंधांचा फायदा घेत सोनूने सासूचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले आणि त्याआधारे तो तिला ब्लॅकमेल करू लागला. ब्लॅकमेलिंगमुळे त्रस्त झालेल्या सासूने ही संपूर्ण गोष्ट आपली मुलगी आणि सोनूची पत्नी हिला सांगितली. याच दरम्यान, सोनू त्याच्या सासूवर तिने बिजनौरमधील दिलेला प्लॉट विकण्यासाठी दबाव टाकत होता. तसेच, अनैतिक संबंधांचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही देत होता.
या ब्लॅकमेलिंग आणि त्रासाला कंटाळून सासू आणि पत्नी या दोघींनी मिळून सोनूचा काटा काढण्याचा कट रचला. योजनेनुसार, त्यांनी आधी सोनू सैनीला झोपेच्या गोळ्या देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर दोघींनी मिळून दोरीने त्याचा गळा दाबून हत्या केली. एवढ्यावरच न थांबता, या खुनाला आत्महत्येचे रूप देण्यासाठी त्यांनी सोनूचा मृतदेह गळफास देऊन लटकवला.
( नक्की वाचा : Dombivli News: डोंबिवलीच्या रस्त्यावर थरार! कडेवर बाळाला घेऊन महिला फेरीवाल्याने अंगावर डिझेल ओतले; कारण... )
बागपतचे एएसपी प्रवीण सिंह चौहान यांनी या हत्येचा खुलासा करताना सांगितले की, मृतकाच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला. मृतक सोनूची सासू आणि पत्नीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अनैतिक संबंध, ब्लॅकमेलिंग आणि मालमत्ता विक्रीचा दबाव या कारणांमुळे ही हत्या करण्यात आली, अशी माहिती एएसपी चौहान यांनी दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world