Pune News : पुण्यात राहिली, संसार थाटला; मात्र एक चूक नडली; महिलेला मायदेशी पाठविण्याची प्रक्रिया सुरू

फातिमा अमजद अख्तर (वय ३५) असे या महिलेचे नाव आहे. गेल्या काही वर्षांपासून ती भोसरी परिसरात राहत होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

सूरज कसबे, प्रतिनिधी 
 
Pune News : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) भोसरी परिसरात अवैध वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी महिलेला ताब्यात घेतले आहे. व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ती येथे राहत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फातिमा अमजद अख्तर (वय ३५) असे या महिलेचे नाव आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपासून ती भारतात राहतेय. काही वर्षांपासून ती भोसरी परिसरातील चक्रपाणी वसाहत भागात माला विट्ठल डावखर उर्फ फातिमा बेगम फईमुद्दीन या नावाने राहत होती. फातिमा अधिकृत व्हिसा घेऊन भारतात कामाच्या शोधात आली होती. ती चक्रपाणी वसाहत परिसरात वास्तव्यास राहून भोसरी परिसरात अनेकांच्या घरी घरकाम करत होती.

विवाह आणि साथीदार

तिचा विवाह कर्नाटक राज्यातील एका तरुणाशी झाला असून दोघेही भोसरीमधील चक्रपाणी वसाहत परिसरात राहत होते. तिच्या पतीला ती बांगलादेशी असल्याची कल्पना होती.

नक्की वाचा - Pune News : 'माझी नाही तर कुणाचीच नाही' प्रेयसीच्या हत्येसाठी विवाहित तरुणाचा प्लान, पेट्रोल पंपाजवळच....

व्हिसाची मुदत संपल्याने कारवाई

फातिमा हिच्या व्हिसाची मुदत संपूनही ती अवैधरित्या भारतात वास्तव्य करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने तिच्यावर कारवाई केली. तिला मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पोलीस आता फातिमा अमजद अख्तर हिला तिच्या मूळ मायदेशी (बांगलादेश) परत पाठवण्याची प्रक्रिया करत आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेने ही कारवाई केली असून,  तिला मायदेशी परत पाठवण्याची पुढील प्रक्रिया सुरू आहे.

Advertisement
Topics mentioned in this article