Beed Crime : नशिबी दारिद्र्य अन् दारूचं व्यसन, लेकासोबत पेग रिचवत बसलेल्या बापाचं संतापजनक कृत्य

नशिबी आलेलं दारिद्र्य त्यात दारूचं व्यसन यातून संतापलेल्या बापाने उचललेलं पाऊल हैराण करणारं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

आकाश सावंत, प्रतिनिधी

नशिबी आलेलं दारिद्र्य त्यात दारूचं व्यसन यातून संतापलेल्या बापाने उचललेलं पाऊल हैराण करणारं आहे. बीडमदील माजलगाव शहराजवळील खानापूर येथे राहणाऱ्या एका बापाने स्वत:च्या लेकाची अत्यंत निघृणपणे हत्या केली. आज रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रोहीत गोपाळ कांबळे असं मृत तरूणाचं नाव असून गोपाळ विठ्ठल कांबळे असे आरोपी बापाचे नाव आहे. मृत मुलगा आणि आरोपी असलेला बाप या दोघांनाही दारूचे व्यसन होते. दारू आणण्याच्या कारणावरून या दोघांमध्ये नेहमीच कुरबुरी व्हायच्या. आठ दिवसांपुर्वीच रोहीत कांबळे याने गळफास घेऊन आत्महत्येचा देखील प्रयत्न केला होता. दोघेही एकत्र दारू प्यायला बसायचे. मात्र दारू आणण्यावरुन, आर्थिक कारणांवरुन दोघांमध्ये नेमकी भांडत होत असयाचं. आज 4 मे रोजी सकाळी दोघेही दारूच्या नशेत असतानाच पुन्हा त्यांच्यात कुरबूर झाली. यावेळी बापाने जवळच पडलेला लाकडी बांबू डोक्यात घालून त्याचा खून केला.

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Pune News : पुण्यातील प्रसिद्ध मंदिरात अल्पवयीन मुलाचं किळसवाणं कृत्य, CCTV Video पाहून भाविकांचा संताप


घटनास्थळी माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहूल सुर्यतळ, पोलीस उपनिरीक्षक आकाश माकणे आणि इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे. आरोपीला पोलीसांनी घटनास्थळाहून अटक केली.

Advertisement

दारुच्या नशेपायी जीवनाची दुर्दशा

गेल्या आठ दिवसात बीड जिल्ह्यात दारूच्या कारणावरून सख्ख्या नात्यातील लोकांची हत्या करण्यात आली आहे. गेल्या आठवडाभरात अशा जवळपास आठ घटना घडल्या आहेत. अंबाजोगाईच्या येल्डा येथे मुलाने आपल्या आईचा, तर परळीत पुतण्याने चुलतीच्या नरडीचा घोट घेतला होता. माजलगावात काही दिवसापुर्वी बाबासाहेब आगे यांची हत्या झाली होती ती देखील आरोपीने दारूच्या नशेतच केली होती. माजलगावातच एका ढाबा चालकाचा मर्डर करण्यात आला होता. तो देखील दारूच्या बिलावरूनच झाला होता. आता खानापूर येथील ही घटना देखील दारूच्या नशेतच झाली आहे.

Topics mentioned in this article