जाहिरात

Beed Crime: संतोष देशमुखांचे कुटुंबीय झोपेत... मध्यरात्री भयंकर घडलं, फॉरेन्सिक टीम गावात दाखल, प्रकरण काय?

संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, पत्नी अश्विनी देशमुख, आई आणि कुटुंबातील सर्व सदस्य झोपलेले असताना हा प्रकार घडला आहे. सकाळी उठल्यानंतर हा संपूर्ण प्रकार लक्षात आला.

Beed Crime: संतोष देशमुखांचे कुटुंबीय झोपेत... मध्यरात्री भयंकर घडलं,  फॉरेन्सिक टीम गावात दाखल, प्रकरण काय?

आकाश सावंत, बीड:

Beed Sarpanch Santosh Deshmukh Home Robbery:  बीडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. बीडच्या मस्सजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी घरफोडी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांच्यासह सर्व कुटुंबीय झोपेत असतानाच हा गंभीर प्रकार घडला. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून याबाबतचा अधिक तपास सुरु आहे. 

Yeola Crime: ट्रक अडवला, 30,000 मागितले... पैसे न दिल्याने पोलिसांनीच वाहन जाळले? नाशिकमध्ये खळबळ

संतोष देशमुख यांच्या घरी चोरी

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीडच्या मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी मध्यरात्री घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रात्री घरात दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, पत्नी अश्विनी देशमुख, आई आणि कुटुंबातील सर्व सदस्य झोपलेले असताना हा प्रकार घडला आहे. सकाळी उठल्यानंतर हा संपूर्ण प्रकार लक्षात आला.

 यानंतर याबाबतची पोलिसांना माहिती देण्यात आली असून मस्साजोगमध्ये केज पोलिसांसह बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि फॉरेन्सिक टीम देखील दाखल झाली आहे. देशमुख कुटुंबीयांसह मस्साजोग गावात आणखी काही ठिकाणी घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून अधिक तपास सुरु आहे. 

मस्सजोगमध्ये पोटनिवडणूक... 

दरम्यान, दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी मस्साजोग मध्ये पोटनिवडणूक पार पडत आहे. ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे. अत्यंत साधेपणाने भावनिक वातावरणात त्यांनी केजच्या तहसील कार्यालयात आपला उमेदवारी नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला.

Ajit Pawar: "VSR च्या मालकाला राज्यातील बडा नेता भेटला; काही कागदपत्रेही घेतली"; रोहित पवारांचा ट्वीटबॉम्ब

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com