जाहिरात

Ajit Pawar: "VSR च्या मालकाला राज्यातील बडा नेता भेटला; काही कागदपत्रेही घेतली"; रोहित पवारांचा ट्वीटबॉम्ब

Rohit Pawar: VSR चा मालक व्ही. के. सिंग स्वतः त्या नेत्याला रिसीव्ह करण्यासाठी उपस्थित होता आणि त्याने त्या नेत्याच्या पीएला काही 'महत्त्वाची कागदपत्रे' दिली, असा दावा देखील रोहित पवार यांनी ट्वीटमध्ये केला आहे. 

Ajit Pawar: "VSR च्या मालकाला राज्यातील बडा नेता भेटला; काही कागदपत्रेही घेतली"; रोहित पवारांचा ट्वीटबॉम्ब

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा VSR एव्हिएशन आणि त्याचे मालक व्ही. के. सिंग यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. रोहित पवार यांनी ट्वीट करत राज्यातील एका बड्याने नेत्याचा नाव न घेता उल्लेख केला आहे. 

दिल्लीत ज्येष्ठ पत्रकाराच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनला गेलेला महाराष्ट्रातील एक अत्यंत मोठा नेता VSR एव्हिएशनच्या विमानाने परतला. चार्टर टर्मिनलवर VSR चा मालक व्ही. के. सिंग स्वतः त्या नेत्याला रिसीव्ह करण्यासाठी उपस्थित होता आणि त्याने त्या नेत्याच्या पीएला काही 'महत्त्वाची कागदपत्रे' दिली, असा दावा देखील रोहित पवार यांनी ट्वीटमध्ये केला आहे. 

रोहित यांचं ट्वीट

रोहित पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, "दिल्लीत पत्रकार रजत शर्मा यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनला गेलेला महाराष्ट्रातला अत्यंत मोठा नेता VSR च्या विमानाने परत येतो. प्रायव्हेट चार्टर टर्मिनलवर त्या नेत्याला VSR चा मालक व्ही. के. सिंग रिसिव्ह करतो. त्या नेत्याशी हस्तांदोलन करतो. त्या नेत्याच्या पीएच्या हातात काही कागद देतो. विशेष म्हणजे अजितदादांच्या अपघातातील मृत पायलट कपूरचा मुलगा त्या नेत्याच्या विमानाचा पायलट असतो. हे सगळं आश्चर्यचकित करणारं नाही का?"

(नक्की वाचा-  Ladki Bahin Yojna: "...तर 'लाडकी बहीण' योजना बंद करा," हायकोर्टाने राज्य सरकारला झापले)

"अजितदादा अपघात प्रकरण हलक्यात घेऊ नका"

"माझं आजही सांगणं आहे की, अजितदादा अपघात प्रकरण हलक्यात घेऊ नका. व्ही. के. सिंगला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नका.. आणि स्वतःही त्या विमानाने प्रवास करणं टाळा आणि स्वतःचीही काळजी घ्या.. VSR वर एवढा विश्वास ठेवू नका, नाहीतर सगळं काही खूप अडचणीचं ठरू शकतं", असं आवाहन देखील रोहित पवार यांनी केलं.

व्ही के सिंगवर मध्यस्थीचे आरोप

"महाराष्ट्र शासनसोबत आधी केवळ विमानसेवेपुरता मर्यादित असलेला व्ही. के. सिंग ज्याप्रकारे आंध्रप्रदेशमध्ये तेथील नेत्यांशी आर्थिक संबंध असल्याने तेथील मोठ्या प्रकल्पांच्या कामांसाठी मध्यस्थ / दलाल म्हणून काम करत होता. त्याचप्रमाणे आज महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रकल्पांच्या कामासाठी मध्यस्थ /दलाल म्हणून भूमिका बजावत असल्याची नवी माहिती समोर येत आहे. ही माहिती सत्य असेल तर महाराष्ट्र सरकार अजून किती खालच्या पातळीला जाणार आहे? असा प्रश्न पडतो. इतकं सर्वकाही असताना सत्तेत असलेला पक्ष शांत बसून AAIB च्या अहवालाची प्रतीक्षा करतोय, याचं अधिक दुःख वाटतं. याप्रकरणी सीबीआय कडून अधिक सखोल चौकशी होईल, ही अपेक्षा", असं रोहित पवार यांनी म्हटलं.

(नक्की वाचा-  Political News: राज्यात राजकीय भूकंप होणार? एकनाथ शिंदेंचं 'ऑपरेशन टायगर'; ठाकरेंच्या 8 खासदारांची गुप्त बैठक?)

अजित पवारांचा अपघाती मृत्यू

28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळाजवळ VSR एव्हिएशनच्या Learjet 45 या विमानाचा अपघात झाला होता, ज्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कॅप्टन सुमित कपूर यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडी (CID) करत असून, व्ही. के. सिंग यांची देखील चौकशी करण्यात आली आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com