Beed Crime : कोण आहे पूजा गायकवाड? जिच्या प्रेमात अडकून विवाहित माजी उपसरपंचाने संपवलं जीवन

Govind Barge Death : या प्रकरणाचा तपास करताना मागे वळून पाहणं आवश्यक आहे, गेल्या दीड वर्षात भयंकर घडलंय.

जाहिरात
Read Time: 2 mins
पूजा गायकवाड हिच्या प्रेमात अडकलेल्या माजी उपसरपंचाने आत्महत्या केली

सौरभ वाघमारे, प्रतिनिधी

Who is Pooja Gaikwad? बीडमधील गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच (Govind Jagannath Barge) गोविंद जगन्नाथ बर्गे (३४ वर्षे) यांच्या आत्महत्येनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कला केंद्रातील एका नर्तिकेच्या प्रेमात अडकला अन् माजी उपसरपंचाने (Govind Barge Death) स्वत:चाच जीव घेतला. न गोविंद यांनी तिच्या घरासमोर येत स्वत:ला संपवलं.

गाडीमध्ये त्यांनी स्वत:वर गोळी झाडल्याची माहिती आहे. प्रेमात पडलेल्या तिचा अबोला सहन न झाल्याने गोविंदने भयंकर पाऊल उचललं.  या घटनेनंतर अनेक आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. कला केंद्रातील (Kala Kendra) नर्तिका पूजा गायकवाड हिने गोविंदला लुटल्याचा आरोप माजी उपसरपंचाच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे.

दरम्यान ज्या नर्तिकेमुळे माजी उपसरपंचाचने स्वत:चा जीव घेतला ती कोण आहे, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. 

कोण आहे पूजा गायकवाड? l who is Pooja Gaikwad 

मिळालेल्या माहितीनुसार, या नर्तिकेचं नाव पूजा गायकवाड आहे. २१ वर्षी पूजा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका, सासुरे गावातील आहे. दीड वर्षांपूर्वी पूजा बार्शी तालुक्यातील थापडीतांडा या गावातील कलाकेंद्रात जात होती. येथे गोविंग बर्गे आणि पूजाची भेट झाली. यानंतर पूजा पारगाव कला केंद्राकडे वळली. यादरम्यान गोविंद आणि पूजा यांच्यातील मैत्री प्रेमात बदलली. यावेळी गोविंदने तिला पावणे दोन लाखांचा मोबाइलही भेट दिला होता. तो तिला दागिने घेऊन देत होता.

Advertisement

नक्की वाचा - Beed Crime News:कला केंद्र, नाच, iphone, पैसा अन्..बीडच्या विवाहित माजी उपसरपंचाची 'ती' च्या घरासमोर आत्महत्या

इतकेच नाही तर गोविंद याच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, नर्तकी पूजा गायकवाड हिने विविध कारणांमुळे गोविंदकडून पैसे लुबाडले आहेत. प्रेमसंबंध ठेवून ती गोविंदकडून पैसे, सोने लुबाडत होती. तिने दिलेल्या पैशातून मावशी आणि नातेवाईकांच्या नावावर प्लॉट जमीन घेतली. भावाच्या नावावर पाच एकर शेती करावी अशी पूजाकडून मागणी केली जात होती. याशिवाय गेवराईतील नवीन घर माझ्या नावावर कर अन्यथा तुझ्याविरोधात दुष्कर्माचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी गोविंदला दिल्याचं सांगितलं जात आहे. यातून गोविंदने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे. 

सोमवारी शेवटची पोस्ट

पूजा गायकवाड गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसत आहे. तिच्या अकाऊंटवरुन अनेक रील शेअर करण्यात आले आहे. सोमवारी मध्यरात्री गोविंदने आत्महत्या केली. सोमवारी पूजाने तीन रील आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. त्यानंतर मात्र तिने एकही रील शेअर केलेली नाही. सध्या पूजा पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती आहे. 

Advertisement