Beed News: व्याजावर व्याज, त्यावर शिव्या, अपमान अन् कुचंबणा, खाजगी सावकाराचा असा जाच की शेवटी त्यानं...

फटाले यांनी व्याजाचे हप्ते चुकवू नयेत म्हणून पतसंस्था आणि खासगी सावकार अशा दोन्हीकडून कर्ज घेतलं होतं.

जाहिरात
Read Time: 3 mins
बीड:

बीड शहरात अवैध सावकारांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. त्यावर कोणाचाच अंकुश राहिलेला नाही. अशीच स्थिती सघ्या बीड शहरात पहायला मिळत आहे. सावकार व्याजाने पैसे देऊन अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल करत आहेत. काही सावकार तर रोजाने, तासावर, फेडीवर, तर काही महिनेवारी परतफेडीवर पैसे देतात. वेळेवर व्याज नाही दिले तर व्याजावर परत व्याज लावून रक्कम वसुली करतात. त्यात शिवीगाळ व धमकी देखील दिली जाते. त्याचा एक बळी सध्या बीडमध्ये पडल्याचे समोर आले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रामा दिलीपराव फटाले. हे बीड शनिवार पेठ, काळा हनुमान ठाणा परिसरातील रहिवासी आहेत. त्यांचे वय 42 वर्ष आहे. त्यांनी कपडा व्यावसायासाठी सावकाराकडून पैसे घेतले होते. पैसे वेळेवर न दिल्याने सावकार त्यांना वारंवार त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून त्यांनी गळफास घेत आपला जीव दिला आहे. ही घटना 06 जुलै रविवार रोजी घडली. रामा फाटले हे कपडा व्यवसाय करत होते. जिल्ह्यातील आठवडी बाजारातमध्ये जाऊन कपडे विक्री करत होते. कपडा व्यवसायासाठी त्यांनी  बीड मधील काही सावकाराकडून पैसे होते. 

ट्रेंडिंग बातमी - Marathi Hindi Row: मी युपीचा, महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तथाकथित...' 26/11 मधील कमांडोचा राज ठाकरेंना सवाल

त्या सावकारांना ते वेळेवर व्याज देत होते. असं करून ही त्यांना शिवीगाळ केली जात होती. त्यांना नाहक त्रास दिला जात होता. त्यामुळे फाटले यांनी गळफास घेऊन जीवन संपवले. रामा फटाले यांनी काही पत संस्थाकडून कपडा व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. परंतु सावकाराने पैसे देताना चेक घेतले होते. व्याजाच्या पैश्याची परतफेड करून देखील सावकार चेक परत देत नव्हते. व्याजाचे पैसे वेळेवर न दिल्याने व्याजावर व्याज द्यावे अशी तो मागणी करत होता. 

ट्रेंडिंग बातमी - Navi Mumbai Crime: संतापजनक! कॉम्प्युटर क्लासेस चालकाकडून महिला सहकाऱ्याचा विनयभंग

फटाले यांनी व्याजाचे हप्ते चुकवू नयेत म्हणून पतसंस्था आणि खासगी सावकार अशा दोन्हीकडून कर्ज घेतलं होतं. महिन्याकाठी पाच-सहा आठवडी बाजार फिरवून कपडे विकण्याच्या कमाईतून ते वेळेवर रकमेचा जुळवाजुळव करत होते. पण कोरोना नंतर धंदा बसला. खर्च वाढला. त्यामुळे व्याजही वाढत गेले. तरीही त्यांनी जानेवारीत सावकाराच्या हातात शेवटच्या व्याजाची रोकड ठेवली. मात्र चेक हस्तांतरित न करता “उद्या ये, अधिक दंड भर” असा दम देत सावकारांनी कागद आपल्या ताब्यातच ठेवले.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Pune News: अरे पुण्यात चाललंय काय? आता 73 वर्षाच्या वृद्धाने केला 27 वर्षीय तरुणीचा विनयभंग

 मात्र शनिवारी रात्री उशिरा पुन्हा एकदा पैशांची मागणी व फोनवरून शिवीगाळ झाली. पहाटे पाचच्या सुमारास पत्नी सुलभा उठली, तोवर रामा पंख्याला दोरी बांधून लटकले होते. पाठीवर ठेवलेली चिट्ठी – “मी हरलो… माझ्या मृत्यूला हे सावकार कारणीभूत” – एवढंच लिहिलेलं आहे. घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलिस निरीक्षक देविदास चव्हाण याचा आता तपास करत आहेत. अवैध सावकारांवर कारवाईची मागणी पुन्हा एकदा होताना दिसत आहे.