बीड जिल्हा हादरला! 24 तासात दोघांचं अपहरण, तर एकाची हत्या!

बीड जिल्ह्यात 24 तासात दोन अपहरणाच्या घटना घडल्या असून त्यापैकी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांचं अपहरण करून हत्या करण्यात आली.

जाहिरात
Read Time: 3 mins
बीड:

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर झालेल्या हत्येच्या घटनेने जिल्हाच नाही तर राज्यही हादरलं आहे. 24 तासात जिल्ह्यात दोन अपहरणाच्या घटना घडल्या असून त्यापैकी मस्साजोगचे सरपंच संतोष  देशमुखांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. तर परळीत घडलेल्या दुसऱ्या अपहरणाच्या घटनेत व्यापारी अमोल डुबेंनी अपहरणकर्त्यांना सुमारे 15 लाखांचे ऐवज देत स्वतःची कशी बशी सुटका करून घेतली.

नक्की वाचा - मोबाइल... इन्स्टाग्राम...मैत्री... अन् आयुष्याचा शेवट; जालन्यातील अकरावीच्या विद्यार्थिनीसोबत काय घडलं? 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेला येथील पवनचक्की प्रकल्पाच्या सब स्टेशनवर झालेल्या भांडणाची पार्श्वभूमी होती. काही दिवसांपूर्वी मस्साजोग येथील पवनचक्कीच्या सबस्टेशनवरील वॉचमनला मारहाण करण्यात आली होती. यानंतर या ठिकाणी संतोष देशमुख गेले होते. याच कारणावरून पुन्हा एकदा बाचाबाची झाल्याने या वादाला तोंड फुटलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याचाच राग धरून देशमुख यांची हत्या झाल्याची चर्चा गावात सुरू आहे.

Advertisement

सोमवारी दुपारी सरपंच देशमुख यांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर केज पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र सायंकाळी 7 वाजता देशमुख यांचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर हा मृतदेह केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. मात्र आरोपींना ताब्यात घेतल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाहीत असा पवित्रा घेतल्याने वातावरण तापले. त्यातच सोनवणे यांनी पोलीस प्रशासन या प्रकरणात चालढकल करत असल्याचा आरोप केला.

Advertisement

मंगळवारी सकाळी केज व बसाजोग येथे गावकऱ्यांनी ठिय्या करत अंबेजोगाईहून मांजरसुंबाकडे जाणारी सगळी वाहतूक ठप्प केली. जोपर्यंत प्रकरणातील आरोपींना पोलीस अटक करणार नाही, तोपर्यंत आम्ही रस्ता सुरू करणार नाहीत असा पवित्राच या गावकऱ्यांनी घेतला होता. त्यामुळे अहिल्यानगर ते लातूर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. दुपारी आंदोलकांनी आक्रमक होत तेज धारूर या मार्गावर एक बस ही पेटवून दिली.  पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून या प्रकरणातील जयराम चाटे, महेश केदार या दोन आरोपींना ताब्यात घेतले. दोघांना केज तालुक्यातील तांबवा शिवारातून अटक करण्यात आली. या प्रकरणात बीड पोलिसांनी सहा पैकी केवळ दोनच आरोपी ताब्यात घेतले असल्याने मस्सा जोग येथील गावकरी मात्र या आंदोलनावर ठामच होते. आता पोलिसांनी उर्वरित आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन पथकं धाराशिव आणि बीडमध्ये शोध घेण्यासाठी रवाना केले होते.

Advertisement

नक्की वाचा - ​​​​​​​सरपंचाचं अपहरण करुन संपवलं... बीडमधील थरकाप उडवणाऱ्या प्रकरणात दोघांना अटक

सरपंचाच्या अपहरणानंतर 24 तास उलटल्यावर मराठा योद्धा मनोद जरांगे यांनी थेट मस्साजोग गाठत गावकऱ्यांनी केलेल्या ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी आरोपींना अटक झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याची ही त्यांनी ठाम भूमिका घेतली. मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींना फोन करून घटनेची माहिती दिली. जो प्रकार झालाय तो निंदनीय आहे, आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मस्साजोग ग्रामस्थांनी सुरू केलेल्या रास्तारोकोला मनोज जरांगे पाटील आणि बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी भेट दिली आणि चर्चा केली.  त्या चर्चेनंतर अखेर या आरोपींसोबत हितसंबंध असल्याचा आरोप केज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्यावर करण्यात आला होता. बीडचे एस पी अविनाश बारगळ यांनी राजेश पाटील यांचं तडकाफडकी निलंबन केलं आहे. केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचा अहवाल सुद्धा वरिष्ठांना पाठवणार असल्याचे त्यानंतर सांगितले.