जाहिरात

Walmik Karad: परळीत तणाव! रास्ता रोको, आत्मदहनाचा प्रयत्न, कोर्टाबाहेर जोरदार राडा

वाल्मिक कराडवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांना या प्रकरणात फसवलं जात आहे असं आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते.

Walmik Karad: परळीत तणाव! रास्ता रोको, आत्मदहनाचा प्रयत्न, कोर्टाबाहेर जोरदार राडा
बीड:

वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात चालला आहे. खंडणी प्रकरणी न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्याच्या विरोधात मकोका लावण्यात आला. त्यानंतर संतोष देशमुख हत्ये प्रकरणी त्याला बीड कोर्टात सादर करण्यात आलं. खंडणी आणि खूनाचा संबध एसआयटीने जोडला. शिवाय आणखी तपासासाठी त्याची एसआयटी कोठडीही मागितली. बीड कार्टाने ही मागणी मान्य करत 7 दिवसांची एसआयटी कोठडी वाल्मिक कराडला दिली. कोर्टात हे सर्व होत असताना कोर्टा बाहेर मात्र जोरदार राडा सुरू होता. संतोष देशमुख समर्थक आणि वाल्मिक कराड समर्थक कोर्टाबाहेर जमले होते. तर परळी, पांगरी या भागात वाल्मिक कराडच्या समर्थकांनी जोरदार निदर्शनं करत वातावरण तापवलं होतं.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बीड कोर्टात वाल्मिक कराडला हजर करण्यात आलं. यावेळी SIT ने वाल्मिक कराडच्या कोठडीची मागणी केली. त्याच वेळी कोर्टा बाहेर संतोष देशमुख आणि वाल्मिक कराडचे समर्थक मोठ्या प्रमाणात जमले होते. त्यांची कोर्टाबाहेर घोषणाबाजीही सुरू होती. ज्या वेळी वाल्मिक कराडला एसआयटी कोठडी सुनावली गेली त्यावेळी वाल्मिक कराडच्या समर्थकांचा रागा अनावर झाला. त्यांनी कोर्टाबाहेरच जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी संतोष देशमुख यांचे समर्थकही तिथे होते. दोघांचाही आमना सामना झाला. त्यामुळे कोर्ट परिसरातच जोरदार राडा झाला. त्यावेळी पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतलं.

ट्रेंडिंग बातमी - Guardian Minister News:वाद, रस्सीखेच की रुसवे फुगवे ! एक महिन्यानंतर ही पालकमंत्र्यांची नियुक्ती का नाही ?

परळीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता. वाल्मिक कराडचे समर्थक रस्त्यावर उतरले होते. काही जण तर मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करत होते. बीडपासून काही अंतरावर पांगरीतही महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. त्यांनी रस्त्यावर झोपून आंदोलन केलं. वाल्मिक कराड निर्दोष आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांना सोडून देण्यात यावं अशी त्यांची मागणी होती. काही महिलांनी तर अंगावर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांचा हा डाव उधळून लावला. पण महिला ऐकायला तयार नव्हत्या. त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं. 

ट्रेंडिंग बातमी - Rahul Gandhi on Mohan Bhagwat: भारताविरोधात लढा? राहुल गांधींच्या नव्या विधानामुळे भाजप नेते भडकले

वाल्मिक कराडवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांना या प्रकरणात फसवलं जात आहे असं आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांना तातडीने सोडून द्यावे. न्याय प्रणालीवर आमचा विश्वास होता. त्यांनी आज सोडून दिलं जाईल असं वाटत होतं. पण तसं झालं नाही त्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं आहे. जोपर्यंत वाल्मिक कराडला सोडलं जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असं ही या महिला सांगत होत्या. वाल्मिक कराड यांना फसवण्या मागे मनोज जरांगे, सुरेश धस यांचा हात असल्याचा दावा ही या महिलांनी यावेळी केला.   

ट्रेंडिंग बातमी - Santosh Deshmukh : हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड? SITच्या 10 दाव्यांनी फास आवळला; कोर्टात काय घडलं?

गेल्या दोन दिवसापासून वाल्मिक कराडचे समर्थक भलतेच आक्रमक झाले आहेत. परळीत सलग दुसऱ्या दिवशी कडक बंद पाळण्यात आला. बुधवारीही परळी पोलिस स्थानका बाहेर आत्मदहनाचा प्रयत्न झाला. वाल्मिक कराडला मकोका लावल्यानंतर त्याचे समर्थ अधिक आक्रमक झाले आहेत. मकोको शिवाय खुनाचा गुन्हा त्यामुळे वाल्मिकचा बाहेर येण्याचा मार्गच जवळपास बंद झाल्याचं बोललं जात आहे. यामुळे संपुर्ण बीड जिल्ह्यात जणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे.