संपूर्ण देश खवळून निघालेल्या बदलापुरातील (Death of the accused in Badlapur Case) दोन चिमुरडींचं लैंगिक शोषण करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा तुरुंगात मृत्यू झाल्याची (Accused Akshay Shinde Death) बातमी समोर आली आहे. बदलापुरातील (Badlapur Case) एका प्रसिद्ध शाळेत कर्मचाऱ्याचं काम करणारा अक्षय शिंदे याने शाळेतील चार वर्षांच्या चिमुरडींवर स्वच्छता गृहात लैंगिक शोषण केलं होतं. यानंतर बदलापुरातील नागरिकांनी शाळा आणि प्रशासनाविरोधात मोठं आंदोलन पुकारलं होतं. यावेळी अनेकांनी अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात होती.
बदलापूर प्रकरणात आरोपी अक्षय शिंदे विरोधात पुरेसे पुरावे नव्हते. यासाठी एका एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. त्यासाठी पोलिसांनी अक्षय शिंदेंच्या पहिल्या पत्नीचा जबाब नोंदवून घेतला होता.
नक्की वाचा - बदलापूर अत्याचार प्रकरण; आरोपी अक्षय शिंदेला केलेल्या कृत्याचा काहीही पश्चाताप नाही
दरम्यान या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. अक्षय शिंदे याने तुरुंगात पोलिसांची बंदूक घेऊन गोळीबार केला. ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना त्याने तीन राऊंड फायर करीत स्वत:वर गोळी झाडल्याची माहिती समोर आली आहे. यात एक पोलीस जखमी झाला आहे. त्याने पोलिसांच्या बंदुकीने स्वत:वर गोळी झाडली. यात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
नक्की वाचा - किती दिवस मेणबत्त्या जाळणार ? एकदा बलात्काऱ्याला जाळून बघा! गोविंदांकडून बदलापूर घटनेचा निषेध
अक्षय शिंदेच्या पहिल्या पत्नीचा जबाब..
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षयने एकूण तीन लग्न केली होती, आणि त्याच्या पहिल्या दोनही पत्नी त्याला सोडून गेलेल्या होत्या. बदलापूर प्रकरणाचा तपास करण्यासाठी वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. एसआयटीने अक्षयच्या पहिल्या पत्नीचा जबाब नोंदवला होता. तिने सांगितले होते की, लग्नाच्या पाच दिवसांतच ती अक्षयला सोडून गेली होती. अक्षयआपल्यासोबत हिंसक पद्धतीने वागायचा खासकरून शारीरिक संबंधांच्यावेळी तो हैवानासारखा वागायचा. त्याच्या लिंगपिसाट प्रवृत्तीला कंटाळूनच आपण त्याला सोडून गेल्याचे पहिल्या पत्नीने सांगितले होते.