जाहिरात

किती दिवस मेणबत्त्या जाळणार ? एकदा बलात्काऱ्याला जाळून बघा! गोविंदांकडून बदलापूर घटनेचा निषेध

या भयंकर घटनांचा निषेध सर्वत्र केला जात असून दही हंडी (Dahi Handi 2024)  साजरी करत असताना एका गोविंदा पथकानेदेखील या घटनेचा निषेध केला.

किती दिवस मेणबत्त्या जाळणार ? एकदा बलात्काऱ्याला जाळून बघा! गोविंदांकडून बदलापूर घटनेचा निषेध
मुंबई:

बदलापुरातील एका शाळेतील (Badlapur School) दोन चिमुकल्यांवर शाळेच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केले होते. पोलिसांची निष्क्रियता, पालकांना त्यांनी दिलेला त्रास या गोष्टी जेव्हा उजेडात आल्या तेव्हा सर्वसामान्य नागरिकांच्या संतापाचा भडका उडाला होता. बदलापुरातील जनतेने रस्त्यावर उतरत आंदोलने केली होती. या जनतेने रेल्वे रोको आंदोलनही केले होते. या घटनेनंतर अशा प्रकारच्या विविध घटना वेगाने उघडकीस येऊ लागल्या आहेत. या भयंकर घटनांचा निषेध सर्वत्र केला जात असून दही हंडी (Dahi Handi 2024)  साजरी करत असताना एका गोविंदा पथकानेदेखील या घटनेचा निषेध केला. या पथकाने एक फलक झळकावला होता, ज्यावर लिहिले होते की  "किती दिवस मेणबत्ती जाळणार? एकदा बलात्काऱ्याला जाळून बघा. परत कधी मेणबत्ती जाळावी लागणार नाही."

हे ही वाचा : 'मिठी मारली, चुंबन घेतलं'... मल्याळम अभिनेत्रीनं सांगितला लैंगिक छळाचा अनुभव

समितीच्या चौकशी अहवालातून समोर आल्या धक्कादायक बाबी

शालेय शिक्षण विभागाने एक चौकशी समिती नेमली होती. दोन सदस्यीय समितीने बदलापूरच्या ज्या शाळेत हा भयंकर प्रकार घडला होता त्या शाळेत जाऊन चौकशी केली होती. या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. समितीने म्हचलंय की, लहान मुलांना शौचालयात नेण्या आणण्यासाठी दोन सेविका ठेवण्यात आल्या होत्या. मात्र त्या दोघीही घटना घडली तेव्हा शाळेत आल्या नव्हत्या. त्या सेविका असत्या तर कदाचित हे कृत्य घडलेच नसते असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. याशिवाय गेल्या 15 दिवसांचे सीसीटीव्ही फुटेजही सापडत नसल्याचे समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांना सदर प्रकार माहिती असूनही त्यांनी काहीही न केल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी असे सुचवण्यात आले आहे. 

हे ही वाचा : बदलापूर प्रकरणात मोठी अपडेट; शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिकेभोवती कायद्याचा फास!

राज ठाकरे बुधवारी आंदोलकांना भेटणार

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे बुधवारी बदलापूरला जाणार आहेत. बदलापुरातील शाळेत घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर ज्या आंदोलकांनी आंदोलनात भाग घेतला होता. त्या आंदोलकांची भेट घेण्यासाठी राज ठाकरे हे बदलापूरला जाणार आहेत. बुधवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास राज ठाकरे हे सानेवाडीमध्ये येतील अशी माहिती मनसेच्या शहराध्यक्षा संगीता चेंदवणकर यांनी दिली आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com