जाहिरात
This Article is From May 22, 2024

पुणे पोर्शे अपघात प्रकरणात मोठी अपडेट; अल्पवयीन आरोपीचा फास आवळणार!

आज अल्पवयीन आरोपीला कोर्टात हजर करण्यात येणार असून तो उपस्थित राहिला नाही तर त्याला फरार घोषित करण्यात येईल अशीही माहिती समोर आली आहे.

पुणे पोर्शे अपघात प्रकरणात मोठी अपडेट; अल्पवयीन आरोपीचा फास आवळणार!
पुणे:

पुण्यात पोर्शे कारने दोघांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेला अल्पवयीन आरोपीला घटनेच्या 15 तासात जामीन मिळाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात होता. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अल्पवयीन आरोपी बेदरकारपणे पोर्शे कार चालवित होता. यात त्याने बाईकला धडक दिल्याने अनिस दुधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. आरोपी अल्पवयीन असल्याने काही तासात जामीन मिळाला. यानंतर देशभरातून रोष व्यक्त केला जात होता. पुणे पोलिसाच्या कारवाईवरही ठपका ठेवण्यात आला होता. 

आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपीला आज बाल न्याय मंडळात हजर करण्यात येणार आहे. आज अल्पवयीन आरोपीला कोर्टात हजर करण्यात येणार असून तो उपस्थित राहिला नाही तर त्याला फरार घोषित करण्यात येईल अशीही माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांकडून अल्पवयीन आरोपाविरोधात 185 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला सज्ञान ग्राह्य धरलं जावं अशी याचिका पुणे पोलिसांनी बाल न्याय मंडळात केली आहे. 

अल्पवयीन मुलावर 185 कलमांतर्गत गुन्हा दाखल 
पुण्यातील कल्याणी नगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलावर दाखल गुन्ह्यात पोलिसांनी 185 कलम वाढवलं आहे. याआधी त्याच्यावर कलम 304 अंतर्गत सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र अल्पवयीन असल्याच्या कारणावरून न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. मात्र अल्पवयीन आरोपीचा पबमधील दारू पित असतानाचा सीसीटीव्ही फुटेज आणि ज्या वेटरने त्याला दारू दिली त्याच्या जबाबावरुन पुणे पोलिसांनी अल्पवयीन आरोपीविरोधात 185 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वाहन अधिनियम 2019 च्या कलम 185 अंतर्गत भारतात मद्य पिऊन गाडी चालविणे हा गुन्हा आहे. एखादी बाईक किंवा वाहन चालवताना रक्तात 30 मिलिग्रॅमपेक्षा जास्त अल्कोहोल आढळल्यास ड्रिंक अॅण्ड ड्राइव्हच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. 

नक्की वाचा - 'न्याय सर्वांना सारखाच हवा'; पुणे पोर्शे अपघात प्रकरणात राहुल गांधी भाजपवर आक्रमक

बालहक्क मंडळाच्या आदेशांवर उपमुख्यमंत्री फडणवीसांचा आक्षेप 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाल न्याय मंडळाच्या आदेशांवर आक्षेप घेतला आहे. या अटी आश्चर्यकारक असल्याचं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं. आरोपी मुलगा अल्पवयीन असला तरी निर्भया प्रकरणानंतर कोर्टाने दिलेल्या आदेशांनुसार सज्ञान व्यक्तीप्रमाणेच त्याच्यावर कारवाई करावी यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. बाल न्याय मंडळात फेरविचार याचिका दाखल आहे. त्याचा निकाल आल्यानंतर पुढील कोर्टात दाद मागण्याचा निर्णय घेतला जाईल असं फडणवीस म्हणाले. पुणे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून तातडीने कलम 304  नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला याकडे त्यांनी लक्ष वेधलं.  


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com