भाजप आमदार जय कुमार गोरे यांच्या ताफ्यातील गाडीने दहिवडी नजीक शेरेवाडी फाटा येथे दोन तरुणांना चिरडल्याची घटना घडली आहे. शनिवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये रणजीत राजेंद्र मगर आणि अनिकेत नितीन मगर यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर त्यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. पण त्यांना मृत म्हणून घोषीत करण्यात आले.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अपघातात मृत्यू झालेले अनिकेत आणि रणजीत हे दोघेही शेरेवाडी फाट्यावरून बिदालच्या दिशेने दुचाकी वरून चालले होते. त्याच दरम्यान आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील गाडी भरधाव वेगात दहिवडीच्या दिशेने जात होती. या दरम्यान शेरेवाडी फाटा येथे चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला. त्याने गाडीवरचे नियंत्रण सुटून गाडीने दुचाकीवर जाणाऱ्या दोघांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की रणजीत आणि अनिकेत पन्नास मिटर फरफटत गेले. यामध्ये अनिकेत आणि रणजीत दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी दोघांचाही मृत्यू झाल्याची घोषणा करण्यात आली.
ट्रेंडिंग बातमी - भर पावसात शरद पवारांचे आंदोलन, कार्यकर्त्यांना दिली शपथ
जयकुमार गोरे हे भाजपचे आमदार आहेत. ते माण खटाव या विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. भाजपमध्ये येण्या आधी ते काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसचे आमदार म्हणूनही त्यांनी काम केले आहे. मात्र 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी ही ते विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. भाजपकडूनच ते निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्याची तयारी सध्या त्यांनी सुरू केली आहे. त्यामुळे भेटीगाठीचा कार्यक्रम चालू आहे. या दरम्यानच हा अपघात झाल्याचे समजत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world