- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला मागे टाकत सत्ता मिळवण्याची संधी निर्माण केली आहे
- शिवसेना शिंदे गटाला महापालिका निवडणुकीत अपेक्षित कामगिरी करता आली नाही
- भाजपचे शहर अध्यक्ष किशोर शितोळे यांनी भाजपचाच महापौर होणार असे सांगितले
Chhatrapati Sambhajinagar: महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. निकाल ही समोर आले आहे. या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अपेक्षे प्रमाणे कामगिरी करता आली नाही. भाजपने अनेक ठिकाणी शिवसेनेला मागे टाकले आहे. कल्याण डोंबिवली- ठाणे वगळता एकाही महत्वाच्या महापालिकेत शिंदे सेनेला भाजप पेक्षा जास्त जागा मिळवता आलेल्या नाहीत. मुंबई, नाशिक. छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, पनवेल, या महापालिकेत शिंदे सेनेची पिछेहाट झाली आहे. हीच बाब लक्षात घेता भाजपच्या नेत्याने शिंदेंच्या शिवसेनेला डिवचले आहे. शिवाय एक प्रकारे शिंदे आमच्यामुळेच कसे आहेत याचीच आठवण या नेत्याने करून दिली आहे. याला निमित्त ठरलं आहे ते छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा निकाल.
छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगरपालिकेसाठी निवडणूक पार पडली आहे. या महापालिकेत भाजप एक हाती सत्ता स्थापन करू शकते अशी स्थिती आहे. त्यांना फक्त एका नगरसेवकाची गरज आहे. भाजपने आत्तापासूनच सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. असं असलं तरी मित्रपक्ष शिवसेनेला डिवचण्याची संधी या निमित्ताने भाजपने सोडली नाही. आम्हाला अनेक नगरसेवकांची फोन आले होते. त्यामुळे त्यांच्या पाठिंब्यावर भाजपचा महापौर होईल असा विश्वास भाजप शहर अध्यक्ष किशोर शितोळे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे भाजप शिवसेने शिवाय छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्ता स्थापन करेल असे संकेतच त्यांनी या निमित्ताने दिले आहेत.
नक्की वाचा - BMC Mayor: मुंबईच्या महापौरपदासाठी शिंदे आग्रही का आहेत? खरं कारण समोर आलं
निवडणुकीत शिवसेनेसोबत युती व्हावी अशी आमची इच्छा होती असं शितोळे म्हणाले. पण आमचे दोन आमदार आहेत. एक खासदार आहे त्यामुळे जास्त जागा मिळाल्यात असं शिवसेनेचे म्हणणे होते. पण हे दोन आमदार आणि खासदार हे भाजपने घेतलेल्या परिश्रमामुळे निवडून आले होते असं आम्ही त्यांना सांगित होते. पण ते मान्य करण्यास ते तयार नव्हते. शेवटी शिवसेनेच युती तोडली. पण आता निकालानंतर त्यांचे आमदार खासदार हे भाजपमुळेच आले आहेत हे त्यांच्या लक्षात आले असेल असा टोला लगावायला ही शितोळे विसरले नाहीत.
शिवसेना शिंदे गटाचे निवडून आलेले आमदार खासदार हे आमच्या मुळेच निवडून आले आहेत. हे त्यांना आत कळले असले. ते आमचे छोटे भाऊच आहेत असं सांगत त्यांनी शिवसेनेच्या दुखऱ्या नसेवरच बोट ठेवले. त्यामुळे आता शिवसेनेला सोबत घेणार का असा प्रश्न त्यांना करण्यात आला. त्यांना सोबत घेवू असं सकारात्मक उत्तर त्यांनी दिलं. पण सत्तेत शिवसेनेचा सहभाग असेल का? या प्रश्नाचं उत्तर देण्याचं मात्र त्यांनी टाळलं. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील सस्पेन्स ही वाढला आहे. इतर नगरसेवक हे भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मदतीची तेवढी गरज भाजपला राहीलेली नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळेच भाजप नेत्यांनी शिवसेना शिंदे गटाला थेट डिवचले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world