
उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यातील सैदनगली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देहरा मिलक गावात एका 25 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत तरुणीची नाव रुची असं आहे. ती टीजीटीची विद्यार्थिनी होती. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ब्लॅकमेलिंगला कंटाळून 25 वर्षांच्या मुलीने हातावर सुसाईड नोट लिहून आपले जीवन संपवले. नोटमध्ये तिने काही तरुणांवर गंभीर आरोप केले आहेत. कागदावर लिहिलेली चिठ्ठी कोणीतरी फाडून टाकेल अशी भीती तिला वाटत होती. त्यामुळे तिने सुसाईड नोट हातावरच लिहीली.
रुचीने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिली आहे. ज्यात तिने गावातीलच तरुण अरुणला आपल्या मृत्यूसाठी जबाबदार धरले. काही दिवसांपूर्वी रुची एका मुलासोबत बाईकवरून जात होती. त्यावेळी गावातच राहाणाऱ्या अरुणने तिला पाहीले. त्यानंतर त्यांने तिचा त्या मुलाबरोबर बाईकवरून फिरतानाचा फोटो काढला. या फोटोच्या माध्यमातून तो तिला ब्लॅकमेल करू लागला. घरी नाव सांगेन अशी तो धमकी देवू लागला. त्यामुळे रुची घाबरली होती.
नक्की वाचा - Vasai News: अबब! घोटाळेबाज माजी मनपा आयुक्ताचे रेटकार्ड आले समोर, कमिशनचे आकडे पाहून डोळे फिरतील
रुचीच्या कुटुंबीयांनीही अरूणमुळेच मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे. अरुणने सुरुवातीला पैसे घेऊन प्रकरण मिटवण्याचे सांगितले होते. त्यानुसार रुचीने त्याला 5,000 रुपये दिलेही होते. पण त्यानंतर त्याने पैसे मागणे सुरूच ठेवले. त्याने तिच्याकडे 50,000 रुपयांची मागणी केली. सततच्या ब्लॅकमेलिंग आणि मानसिक त्रासाला कंटाळून रुचीने हे टोकाचे पाऊल उचलले. तिला हा त्रास सहन झाला नाही.
नक्की वाचा - पतीचा विकृत कारनामा! पत्नीचे अश्लील व्हिडीओ काढले, ब्लॅकमेल करत डान्सबारमध्ये नाचवले, पुढे...
विद्यार्थिनीचा मृतदेह तिच्या घरात खोलीत गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून अरुण आणि त्याच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस म्हणाले की, सुसाईड नोट आणि इतर पुराव्यांच्या आधारावर प्रकरणाचा तपास केला जात आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. शिवाय हळहळ ही व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world