Pune News : पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सक्तवसुली संचालनालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मनी लाँड्रिंगच्या आरोपांखाली ईडीने जप्त केलेली त्यांची सुमारे 40 कोटी रुपयांची मालमत्ता आता परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डिसेंबर 2022 मध्ये विशेष न्यायालयाने भोसले यांची निर्दोष मुक्तता केल्यानंतर, ईडीने आता त्यांच्या मालमत्तेवरील निर्बंध हटवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
ईडीच्या मुंबई कार्यालयाने पुणे येथील नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक यांना एक अधिकृत पत्र पाठवले आहे. या पत्रात भोसले यांच्या मालमत्तेवरील सर्व निर्बंध काढण्याची विनंती करण्यात आली आहे.
(नक्की वाचा- Ladki Bahin Yojna: 'लाडकी बहीण' योजनेतून रक्षाबंधनला थेट खात्यात मदत; या दिवशी होणार पैसे जमा)
यापूर्वी ईडीने भोसले आणि त्यांच्या कंपन्यांच्या 40 कोटींपेक्षा जास्त मालमत्तेवर तात्पुरती टाच आणली होती. ही कार्यवाही मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) करण्यात आली होती. मात्र, आता न्यायालयाने भोसले यांची निर्दोष मुक्तता केल्यामुळे ईडीला कायदेशीर प्रक्रियेनुसार ही मालमत्ता परत करावी लागत आहे.
(नक्की वाचा- Mira-Bhayandar News : मीरा-भाईंदरमध्ये परप्रांतीयांची पुन्हा मराठी व्यक्तीला मारहाण; महाराष्ट्र एकीकरण समितीचा गंभीर इशारा)
कोर्टाच्या आदेशानुसार आणि कायदेशीर प्रक्रियेनंतर ईडीने मालमत्तेवरील निर्बंध काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे अविनाश भोसले यांना मोठा दिलासा मिळाला आहे.