Pune News : 'तुला मारायला वेळ लागणार नाही'; खंडणी प्रकरणात शिंदे गटाचा नेता फरार

ओंकार नारायण जाधव असंच गुन्हा दाखल झालेल्या शिंदे गटाच्या युवा सेना शहरप्रमुखाचं नाव आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

देवा राखुंडे, प्रतिनिधी

पुण्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी एमआयडीसीमध्ये व्यावसायिकाचं अपहरण करून डोक्याला पिस्तूल लावून खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जेजुरी पोलिसात शिवसेना शिंदे गटाच्या जेजुरी शहर युवासेना प्रमुखासह पाच जणांविरोधात खंडणी, अपहरण यासह इतर आरोपांवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ओंकार नारायण जाधव असंच गुन्हा दाखल झालेल्या शिंदे गटाच्या युवा सेना शहरप्रमुखाचं नाव आहे. त्याच्यासह हर्षल गरुड रा.बेलसर आणि त्याचे अन्य साथीदार यांच्या विरोधात आता जेजुरी पोलीस ठाण्यात बजरंग हनुमंत पवार, यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

तुझा भंगार (स्क्रॅपचा) व्यवसाय आहे. माझ्याकडे गँग आहे. माझी मुलं कमरेला पिस्तूल लावून फिरतात. तुला मारायला वेळ लागणार नाही, असं म्हणत जेजुरीतील बजरंग हनुमंत पवार या व्यावसायिकाकडे यातील आरोपींनी 5 लाखांची खंडणी मागितली आणि दरमहिन्याला 50 हजार देण्यास सांगितलं असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

Advertisement

नक्की वाचा - Pune News : पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेवर मनपाची मोठी कारवाई

याबाबत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, प्रभारी पोलीस अधिकारी दीपक वाकचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसाक, बजरंग पवार हे शनिवारी (3 मे) सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास जेजुरीतून आपल्या दुचाकीवरून घरी निघालेले असताना त्यांच्या दुचाकीला हर्षल गरुड याने अडवलं. तर ओंकार जाधव व इतरांनी त्यांना चार चाकी वाहनामध्ये जबरदस्तीने बसवून मावडी पिंपरी गावच्या हद्दीतील एका शेतात नेले. तेथे डोक्याला पिस्तुल लावून दमदाटी आणि शिवीगाळ करत पाच लाख रुपयांची मागणी केली. तसेच मला माझी गँग सांभाळावी लागते. माझी पोरं कमरेला घोडे लावून फिरतात. तुला मारायला मला वेळ लागणार नाही. तुझा एमआयडीसीमध्ये वेस्टेज उचलण्याचा व्यवसाय आहे. मला आठ दिवसात पाच लाख रुपये द्यायचे आणि दर महिन्याला ओंकार भाऊला 50 हजार रुपये द्यायचे, असं म्हणत आठ दिवसांत पैसे  देण्याची मागणी केली आणि पुन्हा मोरगाव चौक जेजुरीला आणून सोडले.
         
याबाबत जेजुरी पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम 308(2), 137(2), 140(2), 352, 351, 189(2)191(2)शस्त्र प्रतिबंधक कायदा 3 (25)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे करत आहेत. सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Advertisement