जाहिरात

Celina Jaitly : टाकेही भरले नव्हते, चालणेही कठीण; तरीही अभिनेत्री सेलिना जेटलीला नवऱ्यानं घराबाहेर काढलं...

Celina Jaitly Divorce Case : अभिनेत्री सेलिना जेटलीनं तिचा नवरा पीटर हॉगच्या विरोधात मुंबईच्या कोर्टात घरगुती हिंसाचाराची (Domestic Violence) सविस्तर तक्रार दाखल केली आहे.

Celina Jaitly : टाकेही भरले नव्हते, चालणेही कठीण; तरीही अभिनेत्री सेलिना जेटलीला नवऱ्यानं घराबाहेर काढलं...
Celina Jaitly Divorce Case : सेलिना जेटलीनं याचिकेच गंभीर तक्रार केली आहे.
मुंबई:

Celina Jaitly Divorce Case : अभिनेत्री सेलिना जेटलीनं तिचा नवरा पीटर हॉगच्या विरोधात मुंबईच्या कोर्टात घरगुती हिंसाचाराची (Domestic Violence) सविस्तर तक्रार दाखल केली आहे. 'प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक वायलेंस अ‍ॅक्ट, 2005' (Protection of Women from Domestic Violence Act, 2005) अंतर्गत दाखल केलेल्या या याचिकेत सेलिना यांनी पीटर यांच्याकडून झालेल्या भावनिक, शारीरिक, लैंगिक आणि शाब्दिक अत्याचाराचे गंभीर आरोप केले आहेत. या तक्रारीमुळे बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

काय केली तक्रार?

SCREEN'ने दिलेल्या माहितीनुसार, करणजावाला अँड कंपनीने तयार केलेल्या या याचिकेत सेलिना यांनी म्हटले आहे की, पीटर हॉग यांनी वारंवार वंशभेद करणारे (Racist) शेरे मारून त्यांचा अपमान केला. इतकेच नाही, तर पीटर हॉग यांनी त्यांना 'नोकर' (maidservant) संबोधून, त्यांची तुलना आपल्या नोकराशी (maid) केली असल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे. अशा अपमानजनक वागणुकीमुळे त्यांना भावनिक पातळीवर खूप त्रास सहन करावा लागला.

2017 मध्ये सेलिना यांचा एकुलता एक मुलगा शमशेराचे निधन झाले, तसेच त्याच काळात त्यांचे आई आणि वडील दोघांचेही निधन झाले होते. या अत्यंत दुःखद काळात त्या गंभीर नैराश्याशी (severe depression) झगडत असतानाही, पीटर हॉग यांनी त्यांच्यावर मुंबईतील राहते घर आपल्या नावावर हस्तांतरित (transfer) करण्यासाठी दबाव आणला, असेही याचिकेत स्पष्ट करण्यात आले आहे.

( नक्की वाचा : Celina Jaitly: 'नो एन्ट्री' अभिनेत्रीच्या आयुष्यात वादळ; नवऱ्यानं मारहाण, लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार )
 


बाळाच्या जन्मानंतर अवघ्या 3 आठवड्यात घराबाहेर काढले

या याचिकेत देण्यात आलेला एक अत्यंत त्रासदायक प्रसंग म्हणजे बाळाच्या जन्मानंतर अवघ्या 3 आठवड्यांनी घडलेली घटना. याचिकेत म्हटले आहे, "त्यांचे टाके (stitches) अजूनही भरले नव्हते, त्यांना चालणेही कठीण होते... प्रसूतीनंतर 3 आठवड्यांनी त्यांनी आपल्या पतीला विचारले की टाके भरेपर्यंत त्यांनी आपली पितृत्व रजा (paternity leave) वाढवावी आणि मुलांना सांभाळण्यासाठी त्यांना मदत करावी. मात्र, या मागणीवर पीटर हॉग पुन्हा एकदा संतापले आणि सेलिना यांना कृतघ्न म्हटले."

याचिकेनुसार, संतापलेल्या पीटर हॉग यांनी सेलिना यांना मनगटावर पकडले आणि शारीरिकरित्या अपार्टमेंटमधून बाहेर ढकलून दिले. 'माझ्या आयुष्यातून चालती हो' (Get out of my life) असे ते ओरडले. त्यावेळी स्तनपान (breastfeeding) करण्यासाठी योग्य असलेल्या कपड्यांमध्ये सेलिना हॉलवेमध्ये एकटीच उभी राहिली. तिच्या एका शेजाऱ्याने हे पाहिले आणि त्यांना धावून मदत केली, असे या दस्तऐवजात म्हटले आहे.

( नक्की वाचा : Girija Oak: 'एका तासाचा रेट काय?' नॅशनल क्रश गिरीजा ओकला थेट प्रश्न ; 'त्या' मेसेजबाबत धक्कादायक गौप्यस्फोट )
 

10 लाख रुपये पोटगी आणि 50 कोटी रुपयांची भरपाईची मागणी

भावनिक आणि शारीरिक हिंसेच्या या सततच्या घटनांमुळे सेलिना यांना अखेरीस मध्यरात्री ऑस्ट्रिया सोडावे लागले आणि आपल्या तीन मुलांशिवाय भारतात परतावे लागले. भारतात परतल्यानंतर त्यांना समजले की, पीटर हॉग यांनी त्यांच्या मुंबईतील मालमत्तेच्या हस्तांतरणासंदर्भात कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. याचसोबत, त्यांना आपल्या मुलांशी संपर्क साधण्यापासूनही प्रतिबंधित केले आहे. याचिकेत नमूद केल्यानुसार, त्यांना या वर्षी 14 नोव्हेंबरला फक्त एकदाच मुलांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे.

पीटर हॉग यांनी ऑस्ट्रियामध्ये घटस्फोटाची कार्यवाही (divorce proceedings) सुरू केली असली तरी, सेलिना जेटली यांनी सध्या दरमहा 10 लाख रुपये पोटगी (alimony) आणि कमाईच्या नुकसानीपोटी (loss of earnings) 50 कोटी रुपयांची भरपाई (compensation) मागितली आहे. सेलिना आणि पीटर हॉग यांनी मुंबईत एका खासगी समारंभात लग्न केले होते. त्यांना 2012 मध्ये जुळे मुलगे (twins) वीराज आणि विन्स्टन आणि 2017 मध्ये आर्थर नावाचा धाकटा मुलगा असे एकूण तीन मुले आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com