Mumbai Crime : चेंबूरच्या युवान स्पावर काही दिवसांपूर्वी आरसीएफ पोलिसांनी छापेमारी केली होती. यावेळी सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या थायलँडच्या ८ तरुणींसह महिलांची सुटका करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं होतं. भांडाफोड करण्यासाठी पोलिसांनी प्लान आखला होता. त्यांनी यासाठी बोगस ग्राहकांना स्पावर पाठले होत. या बोगस ग्राहकांकडून जबरदस्ती केल्याचा खळबळजनक आरोप तरुणीने केला आहे. मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
'त्या' स्पा रेडदरम्यान काय घडलं?
गेल्या महिन्याच्या २७ ऑक्टोबरला चेंबुरच्या युवान थाऊ स्पावर पीटा अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी थायलँडच्या तरुणींची सुटका केली होती. त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली. दरम्यान महिनाभरानंतर या प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या छाप्यामध्ये ३८ वर्षीय स्पा थेरेपीस्टने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानुसार, त्या दिवशी सायंकाळी ६ वाजता डीप टिश्यू स्पा थेरेपी बुक केली होती. त्यादरम्यान मसाज देत असताना ग्राहकाने महिलेला अश्लील स्पर्श करण्यास सुरुवात केली. यावेळी ग्राहकाने सांगितलं, मी पॉवरफूल व्यक्ती असून पोलिसांचा खास असल्याचं सांगिकलं. खोट्या केसमध्ये अडकवण्याची भीती दाखवून तो महिलेला बळजबरी करीत होता, लोकमतने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
नक्की वाचा - Pune News : 2 कोटी लाच प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्याचा आणखी एक प्रताप उघड; नागरिकांना अक्षरश: आणलं रडकुंडीला
थेरेपिस्टकडे शरीरसंबंधाची मागणी...
धक्कादायक बाबत म्हणजे पोलिसांनी ग्राहक बनवून पाठवलेल्या या व्यक्तीने महिलेला शरीर संबंधाची मागणी केली. इथं सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती असल्याचं सांगून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने तिला विवस्त्र केले. यानंतर तीन अनोळखी व्यक्ती तेथे आले, त्यांनी नग्न अवस्थेतील महिलेचे फोटो आणि व्हिडिओ काढले, असा आरोप महिलेने केला आहे. यानंतर पोलिसांनी महिलेच्या जबाबानंतर झिरो एफआयआर नोंदवत चौकशी सुरू केली आहे.