जाहिरात

Pune News : 2 कोटी लाच प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्याचा आणखी एक प्रताप उघड; नागरिकांना अक्षरश: आणलं रडकुंडीला

दोन कोटी रुपयांच्या लाचखोरी प्रकरणात निलंबित असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी यांच्या विरोधात धक्कादायक बाब समोर आली आहे.

Pune News : 2 कोटी लाच प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्याचा आणखी एक प्रताप उघड; नागरिकांना अक्षरश: आणलं रडकुंडीला

सूरज कसबे, प्रतिनिधी 

Pimpri Chinchwad : दोन कोटी रुपयांच्या लाचखोरी प्रकरणात निलंबित असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी यांच्या विरोधात आता 'पैसे डबल' करून देण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. चिंतामणीने तब्बल सहा जणांची ९३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

सर्वसामान्यांनाच गंडवलं...

या प्रकरणी संतोष बाळकृष्ण तरटे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, निलंबित पीएसआय प्रमोद चिंतामणीने लोकांचा विश्वास संपादन करून त्यांना '२० महिन्यांत गुंतवलेले पैसे दुप्पट करून देतो' किंवा '४ टक्के नफ्याने देतो' असे आमिष दाखवले. संतोष तरटे यांनी २०२३ मध्ये चिंतामणीला १८ लाख रुपये दिले होते. त्यांना २० महिन्यांनंतर ३६ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, चिंतामणीने केवळ १५ लाख ४० हजार रुपये परत केले आणि उर्वरित २० लाख ६० हजार रुपये परत केले नाहीत.

Crime News :शरीर संबंधादरम्यान अडचण...; उपचार घेताना सॉफ्टवेअर इंजिनियरच्या शरीरात भयंकर घडलं, 48 लाखही बुडाले

नक्की वाचा - Crime News :शरीर संबंधादरम्यान अडचण...; उपचार घेताना सॉफ्टवेअर इंजिनियरच्या शरीरात भयंकर घडलं, 48 लाखही बुडाले

 
चिंतामणीने सहा जणांची केली फसवणूक


शांताराम भोंडवे ५ लाख,
गणेश खारगे ५ लाख, 
बिस्मिलाह शेख १० लाख, 
शीतल पाटील ५ लाख
बापूसाहेब खेंगरे ५ लाख 

 
या सहा जणांकडून चिंतामणीने एकूण ९३ लाख रुपये घेतले

दोन कोटींच्या लाच प्रकरणात अडकलेल्या प्रमोद चिंतामणीचे हे नवीन 'प्रताप' समोर आल्यामुळे भोसरी पोलिसांनी आणखी काही फसवणुकीची प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली आहे. घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत. या आधी बावधन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील एका आरोपीच्या जामीनासाठी सकारात्मक अभिप्राय देण्यासाठी चिंतामणीने 2 कोटी रुपयांची लाच मागितली होती. या मधील 50 लाख रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहाथ पकडले होते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com