अमोल पाटील, प्रतिनिधी
Chhatrapati Sambhaji Nagar Robbery News : छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय अंतर्गत कार्यरत असलेल्या सायबर पोलिसांनी गहाळ व चोरीस गेलेले तब्बल 100 मोबाईल शोधून जप्त करत नागरिकांना परत केले आहेत. फेब्रुवारी 2026 ते एप्रिल 2026 या कालावधीत विशेष मोहीम राबवून सायबर पोलिसांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली.शहरातील मुख्य बाजारपेठा,शॉपिंग मॉल,भाजी मंडई,बस स्थानक आणि रेल्वे स्टेशन यांसारख्या गर्दीच्या ठिकाणांवरून नागरिकांचे मोबाईल चोरीला जाण्याच्या आणि हरवण्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली होती.या वाढत्या तक्रारींची दखल घेत,स्थानिक पोलीस ठाण्यांनी सायबर पोलिसांशी समन्वय साधून मोबाईल शोध मोहीम हाती घेतली होती.
तांत्रिक कौशल्याच्या जोरावर परराज्यातून मोबाईल जप्त
सायबर पोलिसांनी अत्यंत चोख तांत्रिक कौशल्याचा आणि अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला.केवळ जिल्हाच नव्हे,तर देशातील विविध राज्यांमधून पोलिसांनी 39 लाख रुपयांचे जप्त केलेले मोबाईल मूळ मालकांना परत करण्यासाठी आज 20 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता पोलीस आयुक्तालयातील मिटिंग हॉलमध्ये एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.पोलीस आयुक्त प्रविण पवार यांच्या हस्ते या मोबाईलचे वितरण करण्यात आले.
नक्की वाचा >> Pune News: बिश्नोई गँगच्या तिघांना उत्तराखंडमधून अटक, 'त्या' मॉलवर अंदाधुंद गोळीबार, 2 कोटींची खंडणी अन्..
नागरिकांनी मानले पोलिसांचे आभार
आपला हरवलेला मौल्यवान मोबाईल आणि त्यातील डेटा सुरक्षित परत मिळाल्यामुळे उपस्थित 52 नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले.या कार्यक्रमास पोलीस आयुक्त प्रविण पवार यांच्याहस्ते मोबाईलचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाला 52 नागरिक उपस्थित होते.ही कारवाई पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रत्नाकर नवले,सहाय्यक पोलीस आयुक्त आशोक राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षक कदीर देशमुख,पोलीस उप निरीक्षक गणेश गिरी,पोलीस अंमलदार वैभव वाघचौरे तसेच सायबर पोलीस स्टेशनच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
नक्की वाचा >> Ahilyanagar News : खंडाळा परिसरात नागरिकांची धडधड वाढली, 15 दिवसांपासून मानवी वस्तीत सुरु होता भयानक प्रकार
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world