Crime News: आई शेतात, वडील पानटपरीवर.. घरात रक्ताचा सडा, 12वीतील मुलीसोबत भयंकर घडलं

Chhatrapati Sambhajinagar News: वैष्णवी खाटेजवळ रक्ताच्या थारोळ्यात गळा चिरलेल्या अवस्थेत पडलेली आढळली. तिला तत्काळ बाहेर ओसरीत आणले असता ती मयत झालेली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

 Chhatrapati Sambhajinagar Crime:  छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील मुरमी येथे १७ वर्षीय तरुणीची अज्ञाताने घरात गळा चिरून हत्या केली. ही धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. वैष्णवी नीळ असे मयत तरुणीचे नाव आहे. या घटनेने गंगापूर तालुका हादरून गेला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. 

12 वीच्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

समोर आलेल्या माहितीनुसार,  वैष्णवी ही वाळूज येथील साईनाथ महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिकत होती. शुक्रवारी दुपारी ती घरी आली. वैष्णवीचे वडील संतोष यादवराव नीळ हे दहेगाव-बिडकीन मार्गावर असलेली पानटपरी चालविण्यासाठी गेले होते, तर आई मथुरा शेतात कामाला गेलेली होती. वैष्णवीचा भाऊ प्रीतेष हा सकाळी शाळेत गेलेला होता.

Sangli Crime: एक दिवस, 2 मर्डर... सांगलीत हत्यांचे सत्र; हादरवणारी स्टोरी समोर

घरात एकटीच असताना गळा चिरला..

महाविद्यालयातून आलेली वैष्णवी घरात एकटीच होती. दुपारी संतोष नीळ यांनी पत्नी मथुरा यांना फोन करून वैष्णवीला रक्ताच्या उलट्या होत असल्याचे सांगितले. तेव्हा मथुरा व इतर नातेवाइकांनी घरी धाव घेतली. तेव्हा त्यांना वैष्णवी खाटेजवळ रक्ताच्या थारोळ्यात गळा चिरलेल्या अवस्थेत पडलेली आढळली. तिला तत्काळ बाहेर ओसरीत आणले असता ती मयत झालेली होती.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली तसेच घटनेचे गांभीर्य ओळखून फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले. पंचनामा करून वैष्णवीचा मृतदेह रुग्णालयात हलविला. याप्रकरणी वैष्णवीच्या आईच्या फिर्यादीवरून अज्ञातावर गुन्हा दाखल केला.

Advertisement

Pune News: येरवडा कारागृहात राडा, एका कैद्याचा मृत्यू, जेलच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर