जाहिरात

Sangli Crime: एक दिवस, 2 मर्डर... सांगलीत हत्यांचे सत्र; हादरवणारी स्टोरी समोर

कुपवाड आणि जतमध्ये जमिनीचा वाद तसेच एकाचा पूर्ववैमनस्यातून हत्या करण्यात आल्याचे उघडकीस झाले आहे.

Sangli Crime: एक दिवस, 2 मर्डर... सांगलीत हत्यांचे सत्र; हादरवणारी स्टोरी समोर

शरद सातपुते, सांगली:

Sangli Crime:  सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून खूनांचे सत्र सुरु आहे. शुक्रवारी सांगली जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी खून झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. कुपवाड आणि जतमध्ये जमिनीचा वाद तसेच एकाचा पूर्ववैमनस्यातून हत्या करण्यात आल्याचे उघडकीस झाले आहे. लागोपाठ सुरु असलेल्या हत्यांच्या घटनांनी जिल्ह्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे. 

एक दिवस, दोन हत्या...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सांगली जिल्ह्यातील कुपवाड आणि जत मध्ये दोन तरुणांचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. सांगली जिल्ह्यात एकाच दिवसात दोन खून झाले. कुपवाड एमआयडीसी येथे राहुल सुनील कदम या 22 वर्षीय सराईत गुन्हेगाराचा तलवार आणि कुकरीने वार करून अत्यंत निर्घृणपणे खून केला. पूर्व वैमनस्यातून हा खून करण्यात आला. 

Pune News: येरवडा कारागृहात राडा, एका कैद्याचा मृत्यू, जेलच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

तर जत येथे यात्रेत फिरण्यासाठी गेलेल्या विकास मलकारी टकले या 26 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून व धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला. जमिनीच्या वादातून हा खून झाला असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय. तर कुपवाड एमआयडीसी मधील राहुल कदम याचा खून त्याच्याच मित्राने पूर्व वैमनस्यातून केल्याचे समोर आले आहे. 

सांगलीत खळबळ

 दरम्यान कुपवाड मधील राहुल कदम याच्या खून प्रकरणी निखिल अनिल यादव, रमेश मुकेश जाधव आणि विनायक उत्तम सूर्यवंशी या तिघांना पोलिसांनी अटक केलीये. दरम्यान सांगली जिल्ह्यात एकाच दिवसात दोन खून झाल्याने तसेच जिल्ह्यात कुनाचे सत्र सुरूच असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी योग्य तपास करुन दहशत माजवणाऱ्यांना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. 

नक्की वाचा - Kalyan News: 2 तरुणी 1 तरूण अन् दारू पार्टी! नशेत रस्त्यावरच जोरदार तमाशा, Video Viral

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com