मोसीन शेख, छत्रपती संभाजीनगर: गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारी घटनांनी कळस गाठला असून भयंकर घटनांनी महाराष्ट्र हादरुन गेला आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण, जालन्यातील मारहाण प्रकरण तसेच स्वारगेट अत्याचारासारख्या घटनांनी महाराष्ट्रामध्ये चाललंय काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे. अशातच आता छत्रपती संभाजीनगरमधून एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आजी-आजोबांनीच आपल्या नातीला विकल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला आहे. आई वडिलांचे छत्र हरवल्यानंतर आजी- आजोबाकडे राहणाऱ्या मुलीसोबत ही भयंकर घटना घडली. जिथे या मुलीला विकले तिथे पतीच्या लैंगिक त्रासामुळे त्रस्त असलेल्या मुलीची पोलिसांकडे याचना केल्याने हे प्रकरण समोर आले.
पिडीत मुलगी दहा वर्षांची असताना वडील वारले. आई विचार न करता लेकीला सोडून गेली. आजी-आजोबा व क़ाकालाही नंतर 14 वर्षांची मुलगी नकोशी झाली. आजी-आजोबांनी एका - कुटुंबाकडून दोन लाख रुपये घेऊन तिचे लग्न लावून दिले. दोन महिने पतीचा शरीरसंबंधांसाठीचा त्रास असह्य झाल्याने तिने पोलिसांना मदत मागितली. ही घटना मंगळवारी उघड झाली. शेवगाव तालुक्यातील ती मुलगी नववीत शिकत होती. आजी, आजोबांनी तिला लग्नासाठी विकायला काढले.
दरम्यान, देवळाई परिसरातील कुटुंबाने मागणी घातली. तिच्या आरोपानुसार, आजी-आजोबांनी तिच्या सासरच्यांकडून तिच्यादेखत दोन लाख रुपये घेतले. 1 जानेवारी 2025 रोजी तिचे गावातच २५ वर्षांच्या युवकासोबत लग्न लावून दिले. मात्र लग्न केलेला युवक तिला शारीरीक संबंधांसाठी त्रास देत होता. हा त्रास असह्य झाल्याने 4 मार्चला त्या मुलीने पोलिस नियंत्रण कक्षाला मदत मागितली. त्यानंतर हे प्रकरण समोर आले. यानंतर मुलीची आजी- आजोबा आणि सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.