
स्वानंद पाटील, बीड: गेल्या काही महिन्यांपासून घडलेल्या गुन्हेगारी घटनांनी बीड जिल्हा चर्चेत आला आहे. एकीकडे संतोष देशमुख देशमुख यांच्या हत्येने वातावरण ढवळून निघालेले असतानाच बीडच्या शिरुरमध्ये एका व्यक्तीला जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सतीश भोसले उर्फ खोक्या असे या मारहाण करणाऱ्या तरुणाचे नाव असून त्याचे आणखीही काही व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असलेला सतीश भोसलेचे नवनवे कारनामे आता समोर येत आहे. एका गरीब व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी सतीश भोसलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता त्याचा हेलिकॉप्टरने एन्ट्री केल्याचा तसेच नोटांचे बंडल गाडीच्या डॅशबोर्डवर फेकतानाचेही व्हिडिओ समोर आलेत.
फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थाटात मिरवणारा, हॅलिकॉप्टरने एन्ट्री घेणारा तसेच नोटांचे बंडल उधळणारा हा तरुण आहे कोण? त्याच्याकडे इतके पैसे आले कुठून? असा सवाल उपस्थित होत असून यावरुनच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही आक्रमक भूमिका घेत सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे. सतीश भोसले हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचे म्हटले आहे.
नेमका कोण आहे सतीश भोसले?
सतीश भोसले हा शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडी येथील रहिवासी आहे. मागील पाच वर्षांपासून तो राजकारात सक्रिय असून भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद त्याच्याकडे आहे. सतीश भोसलेने सामाजिक कार्यातून तसेच पारधी समाजासाठी केलेल्या कार्यातून ओळख निर्माण केली.
तसेच याआधीही सतीश भोसले वर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. अलिकडच्या काळात सुरेश धस यांच्याशी संपर्क आल्याने जवळीक वाढली. सुरेश धस यांच्या कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात दबदबा निर्माण झाला. अशातच गेल्या 24 तासात वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सतीश भोसले याची सर्वत्र चर्चा होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world