जाहिरात

Shocking news: गर्भपातासाठी आली अन् अचानक तब्बेत खालावली! अलिशान 'बंगल्या'चं खतरनाक राज उघडलं

तपासात या रॅकेटचे धागेदोरे सिडको एन-6 मधील 'बीटेल डायग्नोस्टिक पॅथलॅब'पर्यंत पोहोचले आहेत.

Shocking news: गर्भपातासाठी आली अन् अचानक तब्बेत खालावली! अलिशान 'बंगल्या'चं खतरनाक राज उघडलं
  • छत्रपती संभाजीनगर शहरातील अवैध गर्भपात रॅकेटचा पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून पर्दाफाश केला आहे
  • अवैध गर्भपातासाठी वापरली जाणारी घातक औषधे आणि सोनोग्राफीसाठी प्रोब जप्त करण्यात आले
  • एका पीडित महिलेची प्रकृती औषधांच्या ओव्हरडोजमुळे गंभीर झाली असून तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
छत्रपती संभाजीनगर:

मोसीन शेख 

अवैध गर्भपाताच्या घटना आज ही होत आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील रशिदपुरा भागात एक मोठ्या अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकत हा संपूर्ण प्रकरणाचा डाव उधळवून लावला. शहरातल्या'खमर विला' या बंगल्यात हे काळे कृत्य सुरू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. सिटी चौक पोलिसांनी महापालिका आरोग्य विभागाच्या मदतीने पहाटे 2 च्या सुमारास ही कारवाई केली. या प्रकरणी पॅथलॅब चालकांसह 6 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सिटी चौक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांना रशिदपुरा येथील प्लॉट नंबर 16 वर अवैध गर्भपात होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यांनी तातडीने मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर संयुक्त पथक तयार केले. पहाटेच्या सुमारास टाकलेल्या या छाप्यात गर्भपातासाठी लागणारी घातक औषधे, वैद्यकीय साहित्य आणि बेकायदेशीर सोनोग्राफीसाठी वापरला जाणारा 'प्रोब' जप्त करण्यात आला आहे.

नक्की वाचा - Palghar News: सचिन तेंडुलकरचा पालघरमध्ये मास्टरस्ट्रोक! गुहिर गावात काही तरी वेगळं होतय, जाणून तुम्ही ही...

या रॅकेटचा क्रूर चेहरा तेव्हा समोर आला, जेव्हा एका पीडित महिलेची प्रकृती औषधांच्या ओव्हरडोजमुळे खालावल्याचे दिसले. 27 एप्रिल रोजी या महिलेला गर्भपातासाठी आणले होते. तिची प्रकृती बिघडल्याने तिला पहाटे 3:30 वाजता तातडीने 'घाटी' रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. या महिलेमुळेच या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. 

नक्की वाचा - Kalyan News: 'लेकीला पोलीस बनवायचंय', 3 वर्षाच्या मुलीला घेऊन माय चालवते रिक्षा, कल्याणच्या हिरकणीची कहाणी!

तपासात या रॅकेटचे धागेदोरे सिडको एन-6 मधील 'बीटेल डायग्नोस्टिक पॅथलॅब'पर्यंत पोहोचले आहेत. लॅब चालक मंगेश थोरात आणि मीनाक्षी थोरात यांच्यासह शाहिदा परवीन, नसरीन शेख, सय्यद इर्शाद अहमद आणि पीडित महिलेच्या आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रशिदपुरा भागातील एका आलिशान बंगल्यात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध गर्भपात केंद्रावर पोलिसांनी मध्यरात्री धडक दिल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com