Chhatrapati Sambhajinagar : MIM च्या अडचणीच वाढ; राजकारणासाठी स्वत:च्या मुलाची ओळख बदलली, नगरसेवकाला अटक

छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अमोल पाटील, प्रतिनिधी

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. महापालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षाच्या अडचणीत आणखी भर पडल्याचे दिसून येत आहे. एमआयएमचे नगरसेवक मेराज खान यांनी निवडणूक शपथपत्रात आपल्या तिसऱ्या अपत्याची माहिती लपवल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या प्रकरणी सिटी चौक पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. तपासात बनावट जन्म प्रमाणपत्र आणि शैक्षणिक कागदपत्रांचा वापर झाल्याचेही उघड झाले असून, एकूण ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट जन्म प्रमाणपत्राचा वापर केल्याचा आरोप; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल

मेराज खान जलील खान यांनी महापालिका निवडणूक २०२६ साठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रात त्यांनी स्वतःला फक्त दोन अपत्ये असल्याचे नमूद केले होते. मात्र, पोलीस तपासात अहमद खान मेराज खान हे त्यांचे तिसरे अपत्य असल्याचे समोर आले. हे सत्य लपवण्यासाठी मुलाचे नाव बदलून अहमद खान पिता मिनहाज खान असे दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. यासाठी बनावट जन्म प्रमाणपत्र आणि बोनाफाईड सर्टिफिकेट तयार करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.

Advertisement

नक्की वाचा - इंधन दरवाढीचा परिणाम थेट जनावरांच्या बाजारावर; बैलजोड्यांचे दर ऐकून शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली

तपासादरम्यान वाईज इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक इलियास कदीर सिद्दीकी यांनी दिलेल्या माहितीनंतर संबंधित जन्म प्रमाणपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनिषा हिवराळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मेराज खान जलील खान यांच्यासह निलोफर मेराज खान, मिनहाज खान जलील खान, इकरा मिनहाज खान, इलियास कदीर सिद्दीकी, सज्जु उस्ताद आणि अहमद खान मेराज खान अशा एकूण ७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Topics mentioned in this article