जाहिरात

C Sambhajinagar: गळफास घेण्याचा प्रयत्न फसला; सिलिंडरमध्ये कात्री खुपसून CA च्या विद्यार्थ्याचं धक्कादायक पाऊल

छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गॅस सिलिंडरमध्ये कात्री खुपसून त्याचा स्फोट करत वीस वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणाने आत्महत्या केली आहे.

C Sambhajinagar: गळफास घेण्याचा प्रयत्न फसला; सिलिंडरमध्ये कात्री खुपसून CA च्या विद्यार्थ्याचं धक्कादायक पाऊल

Chhatrapati Sambhajinagar News : मानसिक ताण असह्य झाल्याने अनेकदा आत्महत्येसारखं धक्कादायक पाऊल उचललं जातं. मात्र आत्महत्या हा उपाय नसतो, तर प्रश्न सोडविण्यासाठी मानसिक आरोग्यासाठी उपचार किंवा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका तरुणाने एक धक्कादायक पाऊस उचललं आहे. या तरुणाने अत्यंत कठोर पद्धतीने स्वत:चा जीव घेतल्याचं समोर आलं आहे. 

छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गॅस सिलिंडरमध्ये कात्री खुपसून त्याचा स्फोट करत वीस वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणाने आत्महत्या केली आहे. जवाहरनगर परिसरातील न्यू शांतिनिकेतन कॉलनीमध्ये हा प्रकार घडला आहे. ओम संजय राठोड असे या तरुणाचे नाव असून, तो सीएची तयारी करीत होता. 

Latest and Breaking News on NDTV

 

नक्की वाचा - Delhi Triple Murder: चाकूने भोसकले, विटांनी ठेचले... दिल्लीत मुलानेच आई-वडील आणि भावाची केली हत्या

प्राथमिक माहितीनुसार, महाविद्यालयातून परत आल्यावर त्याने घराचं दार बंद करून आधी पंख्याला साडी लावून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न फसल्याने त्याने गॅस सिलिंडरमध्ये कात्री खुपसून त्याचा स्फोट केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने वेळीच आग नियंत्रणात आणत त्यास घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com