जाहिरात

C. Sambhajinagar : छत्रपती ​संभाजीनगरमध्ये युतीचं जागावाटप! कोणत्या पक्षाकडे कोणती जागा; पाहा संपूर्ण यादी

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यात अखेर युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

C. Sambhajinagar : छत्रपती ​संभाजीनगरमध्ये युतीचं जागावाटप! कोणत्या पक्षाकडे कोणती जागा; पाहा संपूर्ण यादी

Chhatrapati Sambhajinagar District Council : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यात अखेर युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या युतीनुसार, शिवसेना २५ जागांवर तर भाजप २७ जागांवर नशीब आजमावणार आहे. पालकमंत्री संजय शिरसाट आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. जिल्ह्याच्या राजकारणात या युतीचे मोठे परिणाम उमटण्याची शक्यता असून दोन्ही पक्षांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

७ तालुक्यात युती, पण सिल्लोड-सोयगावमध्ये 'फ्रेंडली फाईट'

​विशेष म्हणजे ही युती जिल्ह्यातील केवळ सात तालुक्यांपुरती मर्यादित ठेवण्यात आली आहे. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा बालेकिल्ला असलेल्या सिल्लोड आणि सोयगाव या दोन तालुक्यांत मात्र चित्र वेगळे असेल. या दोन तालुक्यातील ११ जागांवर शिवसेना आणि भाजप युती न करता एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. स्थानिक राजकीय समीकरणे आणि कार्यकर्त्यांचा दबाव लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. यामुळे या दोन तालुक्यांतील लढतींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

​वैजापूरच्या जागेवरून भाजपमध्ये संतापाचा उद्रेक

​युतीची घोषणा होताच आनंदाऐवजी गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. विशेषतः वैजापूर तालुक्यातील जागावाटपावरून भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. वैजापूरमधील ८ जागांपैकी भाजपला केवळ ४ जागा मिळाल्याने कार्यकर्त्यांचा संयम सुटला. अनेक वर्षांपासून निवडणुकीची तयारी करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाड्या अडवून त्यांना घेराव घातला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला, ज्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Latur News : 'नेत्यांनी जागा वाटून घेतल्या, कार्यकर्त्यांनी फाशी घ्यावी का?' लातुरमधील राजकीय वातावरण तापलं!

नक्की वाचा - Latur News : 'नेत्यांनी जागा वाटून घेतल्या, कार्यकर्त्यांनी फाशी घ्यावी का?' लातुरमधील राजकीय वातावरण तापलं!

जिल्हा परिषदेसाठी भाजप-शिवसेना युतीचे जागावाटप

छत्रपती संभाजीनगर/फुलंब्री
लाडसावंगी गट - भाजप
करमाड गट - भाजप 
गोलटगांव गट - भाजप 
पिंप्रीराजा गट - भाजप
सावंगी गट - शिवसेना
आडगाव बु गट - शिवसेना
बाबरा गट -भाजपा
पाल गट - भाजपा
गणोर गट - भाजपा
बडोदवाजार गट - शिवसेना

कन्नड विधानसभा
गोंदेगाव गट - भाजपा
नागद गट - शिवसेना
करंजखेडा गट - शिवसेना
चिंचोली लिंबाजी गट - शिवसेना
पिशोर गट - शिवसेना
कुंजखेडा गट - भाजपा
हतनूर गट - भाजपा
जेहुर गट - भाजपा
देवगाव रंगारी गट - भाजपा

वैजापूर विधानसभा
वाकला गट - भाजपा
बोरसर गट - शिवसेना
शिवूर गट - भाजपा
संवदगाव गट - शिवसेना
लासुरगाव गट - शिवसेना
पायगाव गट - शिवसेना
बांजरगाव गट - शिवसेना
महालगाव गट - भाजपा
नेवरगांव - भाजपा

पैठण विधानसभा
बिडकीन गट - भाजप
चितेगांव गट - शिवसेना
आडूळ बू गट - शिवसेना
पाचोड गट - शिवसेना
दावरवाडी गट- शिवसेना
ढोरकीन गट - शिवसेना
पिंपळवाडी पी. गट- शिवसेना
विहामांडवा गट - शिवसेना
नवगाव गट - शिवसेना

गंगापूर विधानसभा
सावंगी गट - भाजपा
अंबेलोहळ गट -भाजपा
रांजणगाव शे. पु. गट - भाजपा
वाळुज बु. गट - भाजपा
तुर्काबाद गट - शिवसेना
शिल्लेगाव गट -शिवसेना
जामगाव गट -शिवसेना
शेंदुरवादा गट -भाजपा

खुलताबाद
वेरुळ गट- भाजपा
बाजारसावंगी गट -भाजपा
गदाणा गट -भाजपा

छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा
दौलताबाद गट - भाजपा
वडगाव कोल्हाटी गट (उत्तर पूर्व) - भाजपा
वडगाव कोल्हाटी गट (मध्य पश्चिम) -शिवसेना
पंढरपूर गट -शिवसेना

सिल्लोड विधानसभा 
सिल्लोड विधानसभा क्षेत्रात भाजप आणि शिवसेना यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. या ठिकाणी एकूण 11 जागा आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com