अमोल पाटील, प्रतिनिधी
Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर येथून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. मोबाइल चोराला विरोध करताना तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. चोराने तरुणाच्या पोटात सुरा खुपसण्याचा प्रयत्न केला. त्याने इतक्या जोरात सुरा खूपसला की तो पोटातच अडकून राहिला. पहाटे ३.३० च्या वेळेस ही घटना घडली. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
तरुणासोबत नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगर शहराच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रात्रीच्या अंधारात शहरात चोरांची दहशत वाढली असून, मोबाईल हिसकावण्यास विरोध केल्यामुळे एका निष्पाप तरुणाच्या पोटात चाकू खुपसल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, हल्लेखोरांनी चाकू इतक्या वेगाने मारला की, तो पोटातच अडकून राहिला. या थरारक घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. ही संतापजनक घटना १५ एप्रिल रोजी पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास एपीआय कॉर्नर येथील सर्विस रोडवर घडली.
नक्की वाचा - Kalyan News : तलाकसाठीच्या बैठकीत वाहिला रक्ताचा पाट; रुक्सारवर जीवघेणा हल्ला
करण जाधव हा तरुण प्रोझोन मॉलमध्ये काम करून रात्री घरी परतत होता. वाटेत थांबून तो फोनवर बोलत असताना दुचाकीवरून आलेल्या तीन नराधमांनी त्याचा मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. जेव्हा करणने आपला मोबाइल वाचवण्यासाठी विरोध केला, तेव्हा चोरांनी त्याच्या पोटावर चाकूने वार केला. वार इतका खोल होता की, चाकू पोटातच अडकला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या करणला तातडीने एमजीएम खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला असून मुकुंदवाडी पोलीस या प्रकारांचा अधिक तपास करत आहेत.