जाहिरात

Chhatrapati Sambhajinagar News : छ. संभाजीनगरमध्ये 1 किलो मटणावरुन पेटली दंगल; तिघे गंभीर जखमी, 15 जणांना अटक

फक्त एक किलो मटण... किंमत किती तर आठशे ते साडे आठशे रुपये. पण याच एक किलो मटणावरुन सिल्लोड तालुक्यातल्या अंभई गावात दंगल पेटलीय.

Chhatrapati Sambhajinagar News : छ. संभाजीनगरमध्ये 1 किलो मटणावरुन पेटली दंगल; तिघे गंभीर जखमी, 15 जणांना अटक

मोसीन शेख, प्रतिनिधी

Chhatrapati Sambhajinagar News :  फक्त एक किलो मटण... किंमत किती तर आठशे ते साडे आठशे रुपये. पण याच एक किलो मटणावरुन सिल्लोड तालुक्यातल्या अंभई गावात दंगल पेटलीय. मंगळवारची रात्र अंभई गावासाठी दहशतीची रात्र ठरलीय. किरकोळ वाटणाऱ्या एका कारणावरुन गावातले दोन गट आमनेसामने आले आणि सगळं गाव वेठीला धरलं. या गावात दंगल पेटली. दोन्ही बाजूंनी मोठी दगडफेक आणि वाहनांती तोडफोड करण्यात आली. दरम्यान हा वाद नेमका कशामुळे झाला? ही दंगल नेमकी कशामुळे पेटली? याचं कारण ऐकाल तर तुम्हीही डोक्याला हात लावून बसाल.

गावात नेमकं काय घडलं? 

अंभई गावात एका तरुणानं आपल्या खाटीक मित्राला एक बकरी विकली. तोच तरुण संध्याकाळी मित्राकडे एक किलो मटण आणायला गेला. मटण घेतल्यावर मित्राने पैसे मागितले. तेव्हा तरुणाने आधी बकरीचे पैसे देण्याची मागणी केली. पैशांच्या देवाण-घेवाणीवरुन दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि वादाचं रुपांतर गाव पेटण्यात झालं. मंगळवारी रात्री दोघांमधील वाद पेटल्यानंतर दोन्ही बाजूचे लोक रस्त्यावर उतरले. दोन्ही बाजूने दगडफेक सुरू झाली. ही दगडफेक इतकी भीषण होती की बुधवारी सकाळी रस्त्यांवर दगडांचा अक्षरश: खच पडला होता. या राड्यात अनेक गाड्या फोडल्या, अनेक घरांचंही नुकसान झालं आहे. हाणामारीत 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस गावात पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. गावाला सध्या पोलीस छावणीचं स्वरुप आलं आहे. या दंगलीप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 15 जणांना अटक केली आहे. तर 30 पेक्षा जास्त लोक फरार आहेत. 

नक्की वाचा - Nalasopara News : पहाटेची वेळ...अजितने कोयता घेतला अन् बहिणीचं मुंडकच छाटलं; कारण ऐकून पोलिसही हादरले

अंभई गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. पोरं बाळं घाबरलीत आणि गावकरी दहशततीत आहेत. एरवी शांत असणारं गाव एक किलो मटणावरुन पेटत असेल तर काय बोलायचं

Listen to the latest songs, only on JioSaavn.com