
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका बालगृहात मुलींचा छळ केला जात होता. ही बाब उघड झाल्यानंतर सर्वजण स्तब्ध झालं. या मुलींमध्ये इतकी भीती होती की, पोलिसांच्या चौकशीत कित्येक मुली काहीही सांगण्यास तयार नव्हत्या. कोवळ्या वयात त्यांना अशा प्रकारच्या भयाण अनुभवाला सामोरं जावं लागत होतं. धक्कादायक बाब म्हणजे या बालगृहात त्यांच्यासोबत इतका भीषण प्रकार घडल्यानंतरही अद्यापही त्या त्याच बालगृहात आहेत.
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालगृहाची (Chhatrapati Sambhajinagar Vidyadeep Children's Home) मान्यता रद्द करण्यात आली असतांना अजूनही मुलींना इतरत्र हलवण्यात आले नसल्याने औरंगाबाद खंडपीठाने यावरून प्रशासनाला प्रश्न विचारले आहे. महिला व बालकल्याण विभागाने बालगृहातील मुलींचे दुसऱ्या बालगृहात स्थलांतराबाबत निर्देश दिले आहेत. मात्र अजून पीडित मुलींचे विद्यादीपमधून इतर बालगृहात का स्थलांतर केले नाही, अशी विचारणा न्यायालयाने केली आहे. त्यामुळे विद्यादीपचा परवाना संपल्यानंतर मुलींचे इतर बालगृहात कायद्यानुसार स्थलांतर केव्हा करणार त्याची शपथपत्रासह माहिती सादर करावी असे आदेश खंडपीठाने दिले आहे.
नक्की वाचा - Crime News: धक्कादायक! घरात मुलीचा मृतदेह, हॉटेलमध्ये प्रियकरासोबत पार्टी करत होती निर्दयी आई
पोलिसांच्या अहवालात धक्कादायक बाबी उघड...
पोलिसांच्या अहवालात (Police Report) धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. बालगृहात विशिष्ट धर्माच्या प्रभावाखाली राहण्यासाठी दबाव टाकला जात होता. त्याशिवाय उपवास करण्यासाठी निर्बंध घालण्यात आले होते. बालगृहात मुलींचा छळ करण्यात आल्याचं समोर आलं आहे. याशिवाय मुलींमध्ये भेदभाव झाल्याचा निष्कर्ष तपास समितीने अहवालात नमूद केला असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे. काही मुलींचा जबाब हा पाठांतर केल्याप्रमाणे एकसुरी असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदवले आहे. तर बहुतांश मुलींनी चकार शब्दही काढ नाही. ही बाब गंभीर असल्याचे मतही अधिकाऱ्यांनी नोंदवले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world