जाहिरात

Shocking Video : खड्डा खोदताना बाजूचा मलबा अचानक अंगावर पडला; एका कामगाराचा मृत्यू

कामगाराच्या अंगावर मलबा पडण्याचा हा सगळा प्रकार बाजूला असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

Shocking Video : खड्डा खोदताना बाजूचा मलबा अचानक अंगावर पडला; एका कामगाराचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरहून एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. येथे एका कामगाराचा क्षणार्धात मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील काबरानगरमधून ही घटना समोर आली.  

छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रेनेजसाठी खड्डा खोदताना अचानक बाजूचा मलबा अंगावर पडून क्षणार्धात कामगाराचा दबून मृत्यू झाला आहे. काबरानगरमध्ये ही घटना घडली. मुकुंद दगडू साळवे असे मृताचे नाव आहे. साळवे कंत्राटदारामार्फत महापालिकेच्या ड्रेनेज खोदकाम करत होते. काबरानगर, जवाहरनगरमध्ये ड्रेनेज लाइन खोदताना दुपारी बाजूचा मलबा त्यांच्या अंगावर पडला. त्यात काही लाकडी साहित्यही त्याच्या अंगावर पडला. यानंतर तातडीने त्याच्या सहकाऱ्यानी वरील मलबा बाहेर काढण्यासाठी धावाधाव सुरू केली. मात्र यातही काही वेळ लागला. 

यानंतर कामगाराला तातडीने गजानन मंदिर परिसरातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी दाखल करुन घेण्यास नकार दिल्याने त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. तोपर्यंत साळवे यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कामगाराच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. दरम्यान कामगाराच्या अंगावर मलबा पडण्याचा हा सगळा प्रकार बाजूला असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com