मनिष रक्षमवार, छत्तीसगड:
Naxalites Killed Contractor: रस्ते बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराची नक्षलवाद्यांनी गळा चिरुन हत्या केल्याची घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे. उत्तरप्रदेशचा रहिवासी असलेल्या या कंत्राटदाराच्या दिवानजीचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले होते, त्याला वाचवण्याचा प्रयत्न केल्याने नक्षलींनी कंत्राटदाराची निर्घृण हत्या केली. पामेड पोलिस स्टेशन परिसरात घडलेल्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
आधी दिवाणजीचे अपहरण...
समोर आलेल्या माहितीनुसार, इम्तियाज अली या कंत्राटदाराची नक्षलवाद्यांनी गळा चिरुन हत्या केल्याची घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे. हा कंत्राटदार उत्तर प्रदेशचा रहिवासी होता. तो बऱ्याच काळापासून नारायणपूर जिल्ह्यातील धौराई परिसरात राहत होता. नक्षलवाद्यांनी त्याला मारून त्याचा मृतदेह जंगलात फेकून दिला. बिजापूरचे एसपी जितेंद्र यादव यांनी घटनेला दुजोरा दिला.
Pune News : पुण्यात 'मानव विरुद्ध बिबट्या' संघर्ष वाढला, ग्रामीण भागासह आता शहराला वेढा
सोडवायला गेलेल्या बिल्डरची हत्या
नक्षलवाद्यांनी प्रथम जेसीबी मशीनच्या दिवानजीचे अपहरण केले. अपहरणाची बातमी मिळताच कंत्राटदार इम्तियाज अली घटनास्थळी पोहोचला. लिपिकाला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना त्याला पकडण्यात आले. नक्षलवाद्यांनी त्याचा गळा चिरून वाटेतच त्याची हत्या केली. घटनेनंतर नक्षलवाद्यांनी जेसीबी मशीनच्या लिपिकाला सोडून दिले.
लिपिकाने कंत्राटदाराच्या कुटुंबाला घटनेची माहिती दिली. कुटुंबाने पामेड पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पामेड पोलिसांचे पथक हत्येच्या ठिकाणी रवाना झाले असून परिसरात शोध मोहीम सुरू आहे. विजापूरचे एसपी जितेंद्र यादव यांनी सांगितले की, नक्षलवाद्यांनी लिपिकाला सोडून दिले, ज्याने संपूर्ण घटना पोलिसांना आणि कुटुंबाला सांगितली.
Goa Fire: अंडरग्राऊंड किचन, आग लागल्याचा पत्ताच नाही, संपूर्ण किचन स्टाफ तडफडून तडफडून मेला
दरम्यान, लिपिकाच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी घटनेचे संभाव्य ठिकाण ओळखले आहे. परिसरात शोध मोहीम सुरू आहे. रस्ते बांधकामाला नक्षल यांनी विरोध दर्शविला होता म्हणून हे कृत्य करण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world