मनीष रक्षमवार
Chhattisgarh News: गेल्या काही वर्षांपासून छत्तीसगडमधील नक्षलवादी चळवळ खिळखिळी होताना दिसत आहे. सरकारने सुरु केलेल्या कठोर मोहिमेमुळे आत्तापर्यंत शेकडो नक्षलवादी मारले गेले असून अनेक जहाल नक्षलींनी शस्त्र खाली ठेवत आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच आणखी २६ कट्टर नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचे समोर आले आहे.
26 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्तीसगडमधील नक्षलविरोधी मोहिमेला शुक्रवारी मोठे यश आले. सुकमा जिल्ह्यात पोलीस आणि प्रशासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ७ महिला नक्षलवाद्यांसह एकूण २६ कट्टर नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केले. या सर्वांवर शासनाने एकूण ६४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
Nagpur Crime: तीन मित्र, दारुची नशा अन् मैत्रिणीवरुन वाद, पुढे जे घडलं.. नागपुरात खळबळ
नक्षलवाद्यांच्या मार विभाग आणि पीएलजीए (PLGA) यांसारख्या आक्रमक तुकड्यांमध्ये हे नक्षलवादी सक्रिय होते. मिळालेल्या माहितीनुसार, आत्मसमर्पण केलेले हे नक्षलवादी केवळ छत्तीसगडमध्येच नव्हे, तर शेजारील ओदिशा आणि मध्य प्रदेशातही अनेक घातपाती कारवायांमध्ये सहभागी होते. या सर्वांनी आत्मसमर्पणाचा निर्णय घेतला आहे.
याबाबत पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी या मोहिमेची माहिती देताना सांगितले की, "शासनाच्या पुनर्वसन धोरणामुळे नक्षलवाद्यांच्या विचारसरणीत बदल होत आहे. आत्मसमर्पण केलेल्यांना सर्व शासकीय लाभ दिले जातील." या मोठ्या कारवाईमुळे नक्षली चळवळीच्या कण्याला मोठा तडा गेल्याचे मानले जात आहे.
अमेरिकेत भारतीय तरुणीची हत्या! 'तो' तिचा बॉयफ्रेंड नव्हता; वडिलांनी सांगितलं नेमकं काय आहे प्रकरण?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world