शुभम बायस्कार, प्रतिनिधी
Amravati News : अमरावतीत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत असल्याच्या तक्रारीवरून महसूल विभागाने धडक कारवाई मोहीम सुरू केली आहे.
दर्यापूर शहरात विविध व्यावसायिकांकडून घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. दरम्यान दर्यापूरमधील अंजनगाव टी-पॉईंट परिसरातील काही हॉटेलमधून महसूल विभागाने घरगुती गॅस सिलिंडर जप्त केले. ही कारवाई सुरू असताना परिसरात मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले. यावेळी जमावाने अधिकाऱ्यांशी धक्काबुक्की करत पंचनामे फाडल्याची माहिती मिळाली आहे. तसेच जप्त केलेले काही सिलिंडर सरकारी वाहनातून काढून काही जण ते घेऊन निघून गेल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुमारे तासभरानंतरही सिलिंडर घेऊन गेलेल्या व्यक्तींपैकी कोणीही हजर झाले नसल्याची माहिती मिळाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world