जाहिरात

Jalna News : शेळ्यांचा गोठा बनला बेकायदेशीर कृत्यांचा अड्डा, जालन्यात पोलिसांनी मोठी कारवाई

जालना जिल्ह्यातील भोकरदनमधून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Jalna News : शेळ्यांचा गोठा बनला बेकायदेशीर कृत्यांचा अड्डा, जालन्यात पोलिसांनी मोठी कारवाई

Jalna News : शेळ्यांच्या गोठ्यात सुरु असलेला गर्भपाताच्या गोरखधंद्याचा जालन्यातील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. भोकरदन तालुक्यातील नांजा गावातील एका गोठ्यात ही कारवाई करण्यात आली आहे. या गोठ्यातून पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून याच गोठ्यात आरोपींनी अनेक महिलांचे गर्भपात आणि गर्भ लिंग निदान चाचणी केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. आरोग्य विभाग आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही संयुक्त कारवाई करून घटना स्थळावरून एक सोनोग्राफी मशीन, औषधी, गर्भपाताच्या गोळ्या, मोबाईल असं साहित्य जप्त केलंय. आरोपींविरोधात पोलीस भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोकरदनमधील धक्कादायक प्रकार उघड...

विशेष म्हणजे पोलिसांनी अटक केलेले दोन्हीही आरोपी हे बोगस डॉक्टर आहेत. केशव गावंडे आणि सतिष सोनवणे अशी या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या बोगस डॉक्टरांची नाव आहेत. यातील दोन्हीही आरोपी डॉक्टर नाहीत. किंवा त्यांचं वैद्यकीय शिक्षण झालेलं नाही.आरोपी सतिष सोनवणे हा बारावी शिकलेला आहे. तर दुसरा केशव गावंडे हा भोकरदन शहरात पॅथॉलॉजी लॅब चालवत असून भोकरदनमध्येच राहतो. तर सतिष सोनवणे हा छत्रपती संभाजीनगरमधील रहिवासी असून तो अवैध गर्भपात प्रकरणातील सराईत आरोपी असल्याचं समोर आलं आहे. अवैध गर्भपात आणि गर्भलिंगनिदान प्रकरणात त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. वर्षभरापूर्वी भोकरदन शहरात अवैध गर्भपात प्रकरणी डॉ. दिलीपसिंग राजपूत यांच्या दवाखान्यावर धाड टाकून पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. अशी कारवाई होऊ नये म्हणून आरोपी शहराबाहेर असणाऱ्या नांजा येथील गोठ्यात हा प्रकार राजरोसपणे करत होते. घटनास्थळवरून पोलिसांनी गर्भलिंगनिदान करण्यासाठी वापरण्यात येणारे छोटे पोर्टेबल प्रोब मशीन, मोबाईल अँप्लिकेशन, टेस्ट ट्यूब इंजेक्शन, गोळ्या ,औषधांचा साठा जप्त केलाय. ज्यावेळी पोलिसांनी धाड टाकली त्यावेळी गर्भलिंग निदान चाचणीसाठी आलेल्या तीन महिलांना देखील पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेत आरोपींना अटक केली.

Mumbai News : चेंबूरच्या 'स्पा'वर धाड, पोलिसांनी ग्राहक बनवून पाठविलेल्या चौघांचंच महिलेसोबत धक्कादायक कृत्य

नक्की वाचा - Mumbai News : चेंबूरच्या 'स्पा'वर धाड, पोलिसांनी ग्राहक बनवून पाठविलेल्या चौघांचंच महिलेसोबत धक्कादायक कृत्य

भोकरदन अवैध गर्भलिंगनिदान आणि गर्भपाताचा अड्डा?

पोलिसांची या अवैध गर्भपात करणाऱ्या गोठ्यावर धाड पडताच गोठा मालक समाधान सोरमारे हा फरार झालाय. मात्र गेल्या वर्षभरात भोकरदन मधील ही दुसरी मोठी कारवाई असल्यानं भोकरदन अवैध गर्भलिंगनिदान आणि गर्भपाताचा अड्डा बनलाय का असा सवाल या कारवाईमुळे उपस्थित झालाय.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com