
केंद्र सरकार लवकरच अॅप-बेस्ड सहकारी टॅक्सी सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे. या सेवेअंतर्गत OLA आणि Uber सारख्या दुचाकी आणि चारचाकी टॅक्सी चालतील. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी बुधवारी लोकसभेत ही माहिती दिली. यामध्ये सहकार संस्था दुचाकी, टॅक्सी, रिक्षा आणि चारचाकी वाहनांची नोंदणी करू शकतील. "सहकार क्षेत्रातील टॅक्सी सेवेसह सहकार क्षेत्रात एक विमा कंपनी देखील सुरू करणार आहे. काही वर्षांत ती देशातील सर्वात मोठी विमा कंपनी बनेल", असं अमित शाह यांनी लोकसभेत म्हटलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पंतप्रधान मोदींनी केवळ 'सहकारातून समृद्धी'चा नारा दिला नाही तर तो प्रत्यक्षातही अंमलात आणला आहे. सहकारी क्षेत्रात ओला आणि उबर सारख्या टॅक्सी सेवा येणार आहेत. याअंतर्गत, दुचाकी आणि चारचाकी दोन्ही टॅक्सी चालतील. त्याचा नफा श्रीमंतांकडे जाणार नाही तर थेट वाहनचालकांकडे जाईल. सहकार हे एकमेव क्षेत्र आहे जे स्वयंरोजगाराद्वारे कोट्यवधी लोकांना देशाच्या विकासाशी जोडते, असं अमित शाहांनी म्हटलं.
सहकार विद्यापीठाची स्थापना
लोकसभेत त्रिभुवन सहकार विद्यापीठ विधेयक 2025 वरील चर्चेला उत्तर देताना केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी म्हटलं की, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर आज देशाला पहिले सहकार विद्यापीठ मिळत आहे. त्रिभुवन दास पटेल यांच्या नावावरून या विद्यापीठाचे नाव देण्यात आले आहे. त्यांनी अमूलसारख्या सर्वात मोठ्या सहकारी दूध उत्पादक संस्थेची पायाभरणी केली.
(नक्की वाचा- HDFC आणि पंजाब अँड सिंध बँकेला रिझर्व्ह बँकेचा दणका, ग्राहकांवर काय परिणाम होणार?)
सहकार विद्यापीठ गुजरातमध्ये का?
गुजरातमध्ये विद्यापीठ स्थापन करण्यातच्याबाब प्रश्नांना उत्तर देताना अमित शाह म्हणाले की, गुजरात सरकारने आम्हाला यासाठी जमीन दिली आहे. विद्यापीठ गुजरातमध्ये स्थापन होत असले तरी त्याचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारतभर असेल. त्याची केंद्रे काश्मीरपासून कन्याकुमारी आणि आसामपर्यंत उघडली जातील. स्थापनेच्या पहिल्याच वर्षात प्रत्येक जिल्ह्याला जोडण्याचे उद्दिष्ट आहे.
विद्यापीठात डिप्लोमा ते पीएचडीपर्यंतचे पदवी अभ्यासक्रम असतील. या विद्यापीठाच्या स्थापनेमुळे सहकारी संस्थांचा विस्तार होईल. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थाही बळकट होईल.
(नक्की वाचा- Mumbai News : ऐश्वर्या राय बच्चनच्या लक्झरी कारला बेस्ट बसची धडक; पाहा VIDEO)
प्रत्येक ग्रामपंचायतीत एक प्राथमिक कृषी पतसंस्था
अमित शाह यांनी या चर्चेत म्हटलं की, पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीत एक प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सहकार क्षेत्राच्या गरजा समजून घेऊन एक वेगळे मंत्रालय निर्माण केले. तेव्हापासून, देशात पंचायत पातळीवर पीएसीएस उघडण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत.