जाहिरात

Crime News : पतीला थार कार केली गिफ्ट, त्यात बसूनच तिला संपवलं; वैवाहिक वादाचा भयंकर शेवट

23 वर्षीय अदीला रहमान बेपत्ता प्रकरणात पोलिसांच्या तपासात मोठी घडामोड पाहायला मिळत आहे.

Crime News : पतीला थार कार केली गिफ्ट, त्यात बसूनच तिला संपवलं; वैवाहिक वादाचा भयंकर शेवट

Crime News : 23 वर्षीय अदीला रहमान बेपत्ता प्रकरणात पोलिसांच्या तपासात मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. पोलिसांनी अपहरण आणि हत्याच्या आरोपाखाली हिस्ट्रीशीटर कुर्बान अली आणि त्याचा भाऊ गुलफाम अलीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुरुवातीच्या तपासानुसार, अदीलाची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह उत्तराखंडच्या एका खाडीत फेकून देण्यात आला होता. 

SUV गाडीच्या आत मारली गोळी...

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, पोलिसांनी दावा केला आहे की, अदीला रहमानची कथितपणे तिचा पती गुलफाम अलीने एसयुव्हीच्या आता गोळी झाडून केली. यानंतर मृतदेह उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यातील मंगलौरमधील एका खाडीत फेकून दिला. अदीला २५ जूनपासून बेपत्ता होती. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, अदीला एलएलबी परीक्षेसाठी हैद्राबादला गेली होती. मात्र त्यानंतर ती बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली. 

नक्की वाचा - Crime News : पत्नीशी वाद, काकीशी जवळीक; अवघ्या 24 तासात खळबळजनक हत्याकांडाचा मोठा खुलासा

अदीलासोबत नेमकं काय घडलं?

पोलीस तपासानुसार, अदीला आणि गुलफाम कथितपणे राजस्थानच्या अजमेरमध्ये राहत होते. दोघेही घरातून पळून आले होते. काही काळानंतर दोघे नोएडाला शिफ्ट झाले. मात्र काही काळापासून दोघांच्या नात्यात दुरावा आला होता. अदीला पतीच्या कुटुंबापासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचं सांगितलं जात आहे. ज्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू होता. २९ जून रोजी दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. यानंतर अदीला दिल्लीहून टॅक्सी करून मुरादाबादला परतली. यादरम्यान गुलफानने तिला जोया भागात रोखलं आणि एसयुव्ही थार कारमध्ये बसण्यास सांगितलं. ही थार तिनेच पतीला गिफ्ट केल्याची माहिती आहे.  या प्रवासादरम्यानही दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. ज्यानंतर पतीने तिची गोळी झाडून हत्या केल्याचा संशय आहे. यानंतर अदीलाचा मृतदेह खाडीत फेकून दिल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणात अधिक तपास केला जात आहे. 


 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com